ब्रिस्बेन - सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि ऋषभ पंत (नाबाद ८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, अशा कठीण परिस्थितीत अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला.
-
India displace Australia to become the new No.2 in the
— ANI (@ANI) January 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ICC Test Team Ranking.
(Pic Source: BCCI Twitter)#AUSvsIND pic.twitter.com/THO5ImLnM5
">India displace Australia to become the new No.2 in the
— ANI (@ANI) January 19, 2021
ICC Test Team Ranking.
(Pic Source: BCCI Twitter)#AUSvsIND pic.twitter.com/THO5ImLnM5India displace Australia to become the new No.2 in the
— ANI (@ANI) January 19, 2021
ICC Test Team Ranking.
(Pic Source: BCCI Twitter)#AUSvsIND pic.twitter.com/THO5ImLnM5
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी ९ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे लक्ष्य पार केले.
ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानावर मागील ३२ वर्षांपासून अजिंक्य होता. भारताने या मैदानावर ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. याशिवाय गाबाच्या मैदानात चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताने हा विक्रम मोडीत काढला.
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.