नवी दिल्ली - भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्याने, तो स्पर्धेत खेळू शकणार की नाही याबद्दल सशांकता निर्माण झाली आहे. मात्र, भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सोमवारी मँचेस्टरला पोहचला आहे. दरम्यान, सैनी हा केवळ नेट सरावासाठी संघामध्ये परतणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे. सैनी याची निवड भारतीय संघात १५ खेळाडूमध्ये 'स्टॅन्ड बाय'च्या रुपात करण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( बीसीसीआय) ने सांगितले की, नवदीप सैनी मँचेस्टरला पोहचला आहे. तो केवळ नेट सरावादरम्यान भारतीय संघासोबत राहिल असं व्यवस्थापनाने सांगितल आहे. दरम्यान, भुवनेश्वर कुमारचे पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात गोलंदाजी करताना स्नायू दुखावले होते. त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करु शकला नव्हता.
विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. पहिल्यादा शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाली. तसेच अष्टपैलू विजय शंकरला बुमराहचा यार्कर चेंडू लागल्याने दुखापत झाली होती.