ETV Bharat / sports

वर्णद्वेषाबाबत आयसीसीने व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली प्रतिक्रिया - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

अमेरिकेमध्ये मागील आठवड्यात एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉयडचे हात बांधून त्याचा गळा गुडघ्याने दाबला होता. यात जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाला. या घटनेचे हिंसक पडसाद उमटले. तसेच वर्णद्वेषाविरुद्ध प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर आयसीसीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

ICC takes a stand against racism, says 'without diversity, cricket is nothing'
वर्णद्वेषाबाबत आयसीसीची प्रतिक्रिया, म्हणाली...
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:24 AM IST

दुबई - आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. वेस्ट इंडीजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डेरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी देखील वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. आता वर्णद्वेषाबाबत आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे.

विविधतेशिवाय क्रिकेट अस्तित्वहिन असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. हे सांगताना आयसीसीने शुक्रवारी ९० सेकंदांची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. ही क्लिप २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आहे. यात जोफ्रा आर्चर न्यूझीलंडविरुद्ध अखेरचे षटक टाकताना दिसत आहे. आयसीसी ही क्लिप शेअर करताना म्हणते की, 'विविध ते शिवाय क्रिकेटचे अस्तित्व काहीही नाही. विविधता नसेल तर स्पष्ट चित्र पुढे येत नाही.'

दरम्यान, हा विश्वकरंडक इंग्लंड संघाने जिंकला होता. तेव्हा इंग्लंडचा कर्णधार आयर्लंडचा इयॉन मोर्गन होता. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू बेन स्टोक्स याचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला, फिरकी गोलंदाज मोईन अली आणि आदिल राशिद हे मूळचे पाकिस्तानी तर सलामीवीर जेसन रॉय हा आफ्रिकन वंशाचा आहे. महत्वाची बाब म्हणजे, विश्वविजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर कर्णधार इयॉन मार्गनने, अल्लाह आमच्या सोबत आहे, असे म्हटले होते.

हेही वाचा - जातीवाचक शेरेबाजी प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज म्हणाला...

हेही वाचा - गुड न्यूज..! क्रिकेटपटूची कोरोनावर मात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.