किंग्स्टन - विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाज हनुमा विहारीने कसोटीतील पहिले शतक झळकावले. त्याने हे शतक आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केले आहे. विहारीने या सामन्यात १११ धावा केल्या आणि गोलंदाज इशांत शर्मासोबत ११२ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा - IND vs WI 2ND TEST : बुमराहमुळे विंडीजची दाणादाण; दिवसभरात यजमानांच्या ७ बाद ८७ धावा
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, विहारी म्हणाला, 'जेव्हा मी १२ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. मी माझे पहिले शतक त्यांना समर्पित करतो. मला आशा आहे ते जिथे कुठे असतील त्यांना माझा अभिमान असेल.'
-
I would like to dedicate my maiden ton to my late father - @Hanumavihari. pic.twitter.com/ItRsG63z0M
— BCCI (@BCCI) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I would like to dedicate my maiden ton to my late father - @Hanumavihari. pic.twitter.com/ItRsG63z0M
— BCCI (@BCCI) September 1, 2019I would like to dedicate my maiden ton to my late father - @Hanumavihari. pic.twitter.com/ItRsG63z0M
— BCCI (@BCCI) September 1, 2019
विहारीने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो व्यवस्थित झोपू शकला नव्हता. तो म्हणाला, 'मी पहिल्या दिवशी ४२ धावा झालेल्या असताना मला रात्री नीट झोप आली नाही. मी या परिस्थितीत शतक केल्यामुळे खुष आहे.'
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विंडीजवर कुरघोडी केली आहे. बुमराहने हॅट्ट्रिकसह घतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर विंडीजची दुसऱ्या डावात ७ बाद ८७ धावा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ फॉलोऑनच्या छायेत सापडला आहे.