ETV Bharat / sports

''2011चा वर्ल्डकप धोनीच्या संघासाठी खूपच सोपा होता'' - gambhir on 2011 wc news

गंभीर म्हणाला, "धोनीला कसोटी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार होण्याचे कारण झहीर खान आहे. झहीर धोनीला मिळाला याचे श्रेय गांगुलीला जाते. मला वाटते, की झहीर हा भारताचा सर्वोत्कृष्ट जागतिक दर्जाचा गोलंदाज ठरला. धोनी हा एक अत्यंत नशीबवान कर्णधार आहे. कारण प्रत्येक फॉर्मेटमध्ये त्याला अद्भूत संघ मिळाला.''

gautam gambhir feels ms dhoni won many trophies because of sourav ganguly
''2011 चा वर्ल्डकप धोनीच्या संघासाठी खूपच सोपा होता''
author img

By

Published : Jul 12, 2020, 12:55 PM IST

Updated : Jul 12, 2020, 1:17 PM IST

नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनी खूप भाग्यवान होता. कारण, त्याला प्रत्येक फॉर्मेटमध्ये एक अद्भुत संघ मिळाला. त्याच्या यशामागे माजी गोलंदाज झहीर खानचाही हात आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिले.

गंभीर म्हणाला, "धोनीला कसोटी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार होण्याचे कारण झहीर खान आहे. झहीर धोनीला मिळाला याचे श्रेय गांगुलीला जाते. मला वाटते, की झहीर हा भारताचा सर्वोत्कृष्ट जागतिक दर्जाचा गोलंदाज ठरला. धोनी हा एक अत्यंत नशीबवान कर्णधार आहे. कारण प्रत्येक फॉर्मेटमध्ये त्याला अद्भूत संघ मिळाला. 2011चा वर्ल्ड कप धोनीच्या संघासाठी खूपच सोपा होता. कारण आमच्याकडे सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसुफ आणि विराटसारखे खेळाडू होते. त्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट संघ मिळाला. तर गांगुलीला यासाठी कठोर परिश्रम करावे लागले. त्यामुळे धोनीने खूप विजेतेपदे पटकावली."

यापूर्वी गंभीरने 2011च्या वर्ल्डकप विजयामध्ये केवळ महेंद्रसिंह धोनीच्या षटकाराचा उत्सव साजरा करणाऱ्यांना फटकारले होते. गंभीर म्हणाला, ''वर्ल्डकप षटकारामुळे नव्हे तर संपूर्ण संघाने जिंकला होता. '' 2011मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव भारताने दुसर्‍यांदा वर्ल्डकप जिंकला. अंतिम सामन्यात धोनीने नुवान कुलसेकराला षटकार ठोकत हा विजय मिळवला होता. या सामन्यात गंभीरने 97 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने नाबाद 91 धावांची खेळी केली.

Last Updated : Jul 12, 2020, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.