ETV Bharat / sports

धोनीच्या निवृत्तीवर गॅरी कर्स्टन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

author img

By

Published : May 29, 2020, 11:23 AM IST

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी धोनीसंबंंधित या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. कर्स्टन म्हणाले, ''धोनीला त्याच्या अटींप्रमाणे निवृत्ती घेऊ द्या. धोनी एक अतुलनीय क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे जबरदस्त बुद्धिमत्ता, शांत स्वभाव, सामर्थ्य, तंदुरुस्ती, वेग आणि सामना जिंकवण्याची क्षमता आहे.''

Gary kirsten talks about Ms dhoni's retirement and related rumours
धोनीच्या निवृत्तीवर गॅरी कर्स्टन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई - सोशल मीडियावर पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी धोनीच्या निवृत्तीची बातमी ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली. त्यानंतर, धोनीची पत्नी साक्षीने या बातमीला अफवा म्हटले होते. पण अचानक तिने आपले ट्विट हटवून पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात धोनीच्या निवृत्तीची भीती वाढवली आहे.

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी धोनीसंबंंधित या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. कर्स्टन म्हणाले, ''धोनीला त्याच्या अटींप्रमाणे निवृत्ती घेऊ द्या. धोनी एक अतुलनीय क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे जबरदस्त बुद्धिमत्ता, शांत स्वभाव, सामर्थ्य, तंदुरुस्ती, वेग आणि सामना जिंकवण्याची क्षमता आहे. तो सध्याच्या युगातील एक महान क्रिकेटपटू आहे. खेळातून माघार घेण्याचा हक्क त्याने मिळवला आहे. धोनीची वेळ संपली, असे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही.'' कर्स्टन हे 2011 सालच्या विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी आफ्रिकेकडून खेळताना 14 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

52 वर्षीय कर्स्टन म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून खेळणे अधिक अवघड आहे. माझ्यासाठी खेळणे अधिक आव्हानात्मक होते. भारतीय संघाला प्रशिक्षण देऊ शकलो, हे माझ्यासाठी खास आहे.''

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.