मुंबई Arijit Singh UK Concert : प्रसिद्ध गायक अरिजित सिंग सध्या परदेशात आपल्या कॉन्सर्टमुळे चर्तेत आहे. अलीकडेच अरिजितनं ब्रिटनमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टला मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले होते. या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, अरिजित कोलकाता प्रोटेस्टसाठी तयार केलेलं 'आर कोबे' गाणं गाण्यास नकार देताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम युजरनं त्याच्या पेजवर अरिजित सिंगच्या यूके कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अरिजित कोलकाता प्रोटेस्टमधील गाणं 'आर कोबे' गाण्यास नकार देताना दिसत आहे.
अरिजित सिंगनं 'आर कोबे' गाणं गाण्यास दिला नकार : व्हायरल व्हिडिओत, अरिजित सिंग म्हणतो, "ही जागा योग्य नाही. लोक इथे आंदोलन करायला आलेले नाहीत. ते माझं गाणं ऐकायला आले आहेत. माझा आवाज ऐकण्यासाठी आले आहे. त्यामुळे त्या गाण्यासाठी ही योग्य वेळ आणि ठिकाण नाही." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "तुम्हाला हे खरंच ऐकायचं असेल तर कोलकात्याला जा. काही लोकांना गोळा करा, जिथे जास्त बंगाली लोक असतील, रस्त्यावर उतरा. यानंतर तो त्याच्या 'रमता जोगी' (1999 चित्रपट ताल) या गाण्यावर पुन्हा परत येतो.
ट्रेनी डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या : 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण कोलकातामधील डॉक्टरांनी आरोपींवर कठोर कारवाई आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू केलय. अरिजित सिंगनं आपल्या नव्या गाण्याच्या माध्यमातून या निषेधात सहभाग घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी अरिजितनं कोलकाता निषेधाचे समर्थन करणारे 'आर कोबे' गाणं रिलीज केलं होतं. हे गाणं सर्वांच्या मनाला भिडलं. या गाण्याच्या माध्यमातून अरिजितनं पीडितेला न्याय देण्याचं आवाहन केलं असून कोलकात्यातील लोकांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत अशी आशा व्यक्त केली होती. 'आर कोबे'चा अर्थ 'हे कधी संपेल?' असा आहे.
हेही वाचा :