ETV Bharat / entertainment

दुबई मॉलमध्ये सलमान खान हाय सिक्युरिटीसह झाला स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan - SALMAN KHAN

Salman Khan : वडील सलीम खान यांना धमकी मिळाल्यानंतर सलमान खान दुबईत दिसला आहे. यावेळी तो दुबईमधील एका मॉलमध्ये आपल्या हाय सिक्योरिटीसह फिरत होता. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Salman Khan
सलमान खान (सलमान खान (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 5:37 PM IST

मुंबई Salman Khan : अभिनेता सलमान खान अलीकडेच दुबई मॉलमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो त्याच्या हाय सिक्योरिटीसह फिरताना दिसला. मॉलमध्ये आधीच एक कार्यक्रम सुरू असला तरी, तिथे उपस्थित असलेले लोक सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी आतुर असल्याचे दिसले. सुरक्षा असताना देखील चाहत्यांनी 'भाईजान'ला चारही बाजूंनी घेरलं होतं. यानंतर सलमानला सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्योरिटी गार्डला पुढं यावं लागलं. सलमान दुबई मॉलमध्ये निळ्या रंगाचा शर्ट, बॅगी पॅन्ट आणि सनग्लासेस घालून होता. यात तो खूपच स्टायलिश दिसत होता. त्याचा बॉडीगार्ड शेरा त्याच्याबरोबर होता.

सलमान खानच्या वडिलांना धमकी : सलमानचे वडील सलीम खान यांना गुरुवारी, 19 सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉक दरम्यान धमकी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सलीम खान सलमान खानबरोबर वांद्रे येथील घराजवळ मॉर्निंग वॉकसाठी निघाले, तेव्हा स्कूटरवर स्वार असलेला व्यक्ती आणि बुरखा घातलेली एक महिला त्याच्याजवळ आले. यानंतर त्यांनी तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेऊन सलीम खान यांना धमकावलं. यावेळी त्या महिलेनं म्हटलं, "लॉरेन्स बिष्णोई को भेजू क्या." या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून बुरखा घातलेल्या महिलेचा आणि पुरुषाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार : दरम्यान सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या काही महिन्यांनंतर ही घटना घडली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये मुंबईतील वांद्रे भागात खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचं उघड झालं. गँगस्टरचा भाऊ अनमोल बिश्नोईनं फेसबुकवर पोस्ट टाकून गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. याशिवाय सलमाननं त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या धमक्यांबाबतही खुलासा केला होता. दरम्यान 'भाईजान'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'सिकंदर' चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदला प्रदर्शित होईल. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. 'सिकंदर'चं दिग्दर्शन एआर मुरुगादास हे करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या', सलीम खान यांना धमकी दिल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Salim Khan Threat
  2. दिवाळीला डबल धमाल! दबंग सलमान खान रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये करणार कॅमिओ - Ajay Devgn
  3. 'बिग बॉस 18'च्या पहिला प्रोमोसह थीम रिलीज, सलमान खान करणार 'टाईमचा तांडव' - BIGG BOSS 18

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.