इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये निम्रिता चंदानी नामक हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. निम्रिताच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिला न्याय मिळावा, यासाठी 'जस्टिस फॉर निम्रिता' मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सामिल झाला आहे. त्याने निम्रिता मृत्यू प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - Cricket Records: कसोटीत चिवट फलंदाज स्टीव्ह स्मिथला 'शुन्या'वर बाद करणारे ४ गोलंदाज
निम्रिता पाकिस्तानच्या लारकाना शहरात बिबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवत होती. सोमवारी कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये निम्रिताचा मृतदेह आढळला. दरम्यान, निम्रिताची हत्या व्देष भावनेतून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
-
Extremely sad & hurt sad reading about the suspicious death of young innocent girl, Nimrita Kumari.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I hope the justice is served and the real culprits are found. My heart beats with every Pakistani no matter what faith he/she belongs to. Rest in Peace. #JusticeForNimrita pic.twitter.com/2nJMmpMRp8
">Extremely sad & hurt sad reading about the suspicious death of young innocent girl, Nimrita Kumari.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 17, 2019
I hope the justice is served and the real culprits are found. My heart beats with every Pakistani no matter what faith he/she belongs to. Rest in Peace. #JusticeForNimrita pic.twitter.com/2nJMmpMRp8Extremely sad & hurt sad reading about the suspicious death of young innocent girl, Nimrita Kumari.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 17, 2019
I hope the justice is served and the real culprits are found. My heart beats with every Pakistani no matter what faith he/she belongs to. Rest in Peace. #JusticeForNimrita pic.twitter.com/2nJMmpMRp8
हेही वाचा - IND VS SA : भारत-आफ्रिका दुसरा टी-२० सामना, पावसाचा 'मूड' कसा आहे वाचा
सोशल मीडियावर निम्रिताला न्याय मिळावा, यासाठी 'जस्टीस फॉर निम्रिता' मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शोएब अख्तरही सहभागी झाला. त्याने या घटनेबाबत, तरुण आणि निरागस अशा निम्रिताच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे मला खूपच दु:ख झाले आहे. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि तिच्या मारेकऱ्यांना नक्कीच शासन केले जाईल, असा मला विश्वास आहे. कोणत्याही विचारसरणीचा असला, तरी प्रत्येक पाकिस्तानी हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो, अशा आशयाचे ट्विट अख्तरने केले आहे.
दरम्यान, निम्रिताच्या मृत्यूच्या मुद्यावरुन भारतीयांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.