ETV Bharat / sports

बांगलादेशला धक्का, शाकिब दुसऱ्या कसोटीबाहेर! - Shakib Al Hasan in 2nd test againt wi

विंडीजविरुद्ध चटगांव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी शाकिबच्या डाव्या मांडीला दुखापत झाली. या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. परंतु दुखापतीतून सावरत नसल्यामुळे तो दुसर्‍या कसोटीत खेळू शकणार नाही.

शाकिब
शाकिब
author img

By

Published : Feb 9, 2021, 6:28 AM IST

Updated : Feb 12, 2021, 4:59 PM IST

ढाका - बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) ही माहिती दिली.

हेही वाचा - IND vs ENG : भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज

विंडीजविरुद्ध चटगांव येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी शाकिबच्या डाव्या मांडीला दुखापत झाली. या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. परंतु दुखापतीतून सावरत नसल्यामुळे तो दुसर्‍या कसोटीत खेळू शकणार नाही. बीसीबीने एक निवेदन जारी केले आहे की, शाकिब या आठवड्यात संघाच्या बायोबबलमधून बाहेर येईल आणि तंदुरुस्त होण्यासाठी ढाका येथील बोर्डाच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या दुखापतीवर उपचार केला जाईल.

११ फेब्रुवारीपासून शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेची दुसरी कसोटी मालिका होणार आहे. पहिल्या कसोटीत विंडीजने बांगलादेशला तीन विकेट्सने पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.

Last Updated : Feb 12, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.