ETV Bharat / sports

तब्बल १२ वर्षानंतर 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळायचंय आयपीएल! - फिडेल एडवर्ड्स आयपीएल न्यूज

फिडेल एडवर्ड्सने वेस्ट इंडिजकडून २०१२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याचबरोबर कोलपॅक करार संपल्यानंतर आता त्याला आयपीएलमध्येही खेळायचे आहे. या व्यतिरिक्त त्याला यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी विंडीजच्या संघात खेळण्याची इच्छा आहे.

Fidel Edwards IPL return
Fidel Edwards IPL return
author img

By

Published : Feb 2, 2021, 12:29 PM IST

नवी दिल्ली - दिग्गज वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सने कोलपॅक करार संपल्यानंतर वेस्ट इंडिज संघासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. जवळपास दशकभराच्या कालखंडानंतर एडवर्ड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आता त्याला आयपीएलमध्येही खेळायचे आहे.

फिडेल एडवर्ड्सने वेस्ट इंडिजकडून २०१२ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याचबरोबर कोलपॅक करार संपल्यानंतर आता त्याला आयपीएलमध्येही खेळायचे आहे. या व्यतिरिक्त त्याला यंदाच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी विंडीजच्या संघात खेळण्याची इच्छा आहे. ३९ वर्षीय एडवर्ड्सने सध्या अबुधाबी टी-१० लीगमध्ये भाग घेतला आहे.

हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ करणार भारत दौरा

''मी आता वेस्ट इंडीज संघात निवडीसाठी उपलब्ध आहे. कायरन पोलार्ड आणि फिल सिमन्स यांच्याशी मी बोललो आहे. प्रशिक्षण माझ्यासाठी नेहमीच महत्वाचे असते. परंतु गेल्या १८ महिन्यांपासून मी ते बदलले आहे. आता मला स्वत: ला अधिक तंदुरुस्त वाटते. मी इंग्लंडमध्ये बराच वेळ घालवला आहे. माझ्या मते मी सीपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि वेस्ट इंडिज संघात माझी निवड होईल अशी मला आशा आहे'', असे एडवर्ड्सने सांगितले.

युरोपियन युनियनमधून यूके बाहेर पडल्यामुळे कोलपॅक नोंदणी आता अधिकृतपणे बंद झाली आहे. फिडेल एडवर्ड्स हा २१०५पासून हॅम्पशायरकडून खेळत होता. पण आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पूर्णपणे मोकळा झाला आहे. याशिवाय या मोसमातही त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. त्याने २००९च्या आयपीएल हंगामात भाग घेतला होता. डेक्कन चार्जर्स संघाकडून त्याने पदार्पणाचा सामना खेळला होता.

कोलपॅक करार म्हणजे काय?

युरोपियन युनियनचा भाग असलेल्या देशातील नागरिक या युनियनमधल्या देशांमध्ये परदेशी न ठरता काम करू शकतात. म्हणजेच जर्मनीचा एखादा खेळाडू फ्रान्समध्ये कोलपॅक करार स्वीकारून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतो.

क्रिकेट आणि कोलपॅक करार -

युरोपियन युनियनशी संलग्न असलेल्या देशांचे खेळाडू अन्य सदस्य देशांमध्ये परदेशी खेळाडू न ठरता खेळू शकतात. युरोपियन युनियनशी संलग्न देशांचे खेळाडू इंग्लंडमधील स्थानिक म्हणजेच काऊंटी क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतात. जरी ते दुसऱ्या देशाचे असले तरी त्यांना विदेशी खेळाडू म्हणून गणले जात नाही. प्रत्येक काऊंटी संघावर विदेशी खेळाडू खेळवण्यावर काही निर्बंध आहेत. कोलपॅक नियमामुळे विदेशी खेळाडू प्रत्यक्षात विदेशी ठरत नसल्याने, नियमांच्या चौकटीत राहून काऊंटी संघांना फायदा होतो. कोलपॅकद्वारे करारबद्ध झालेला खेळाडू मूळ देशासाठी खेळू शकत नाही. हा करार संपुष्टात आल्यानंतर तो खेळाडू पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.