नवी दिल्ली - इंग्लंड महिला संघातील समलैंगिक जोडपे कॅथरीन ब्रंन्ट आणि नताली स्कायवर यांनी लवकरच साखरपुडा करणार असल्याची घोषणा केली आहे. तब्बल चार वर्ष एकत्रित राहिल्यानंतर दोघींनी प्रेमाची कबुली देत, शुक्रवारी साखरपुड्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर दोघींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मागील वर्षी कॅथरीनने नतालीला प्रपोज केला होता. त्यावर नतालीने होकार दिला. यूनायटेड किंगडममध्ये ११ ऑक्टोंबर हा दिवस 'नॅशनल कमिंग डे' म्हणून साजरा करण्यात येतो. याला एलजीबीटीक्यू समूह दिन म्हणूनही ओळखले जाते.
या दिवसाचे औचित्य साधत कॅथरीन आणि नताली या दोघींनी, आपल्या प्रेमाची कबूली दिली. तसेच नतालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तीन फोटो शेअर केले आहेत. त्याला 'वेलकम टू अवर वाईन एंड मॅगझीन पार्टी' असा कॅप्शनही दिला आहे.
दरम्यान, कॅथरीनच्या कुटुंबीयांचा या नात्याला कडाडून विरोध होता. मात्र, कॅथरीन आपल्या आई-वडिलांची समजूत घालण्यासाठी यशस्वी ठरली. त्यानंतर कॅथरीच्या आई-वडिलांनी दोघांना परवानगी दिली. इंग्लंड क्रिकेट बोर्डही दोघांच्या त्या निर्णयावर खूश असून बोर्डाने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Congratulations to Nat Sciver and Katherine Brunt, who have announced they're engaged ♥️ https://t.co/fUKRiDZIHw
— England Cricket (@englandcricket) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to Nat Sciver and Katherine Brunt, who have announced they're engaged ♥️ https://t.co/fUKRiDZIHw
— England Cricket (@englandcricket) October 11, 2019Congratulations to Nat Sciver and Katherine Brunt, who have announced they're engaged ♥️ https://t.co/fUKRiDZIHw
— England Cricket (@englandcricket) October 11, 2019
हेही वाचा - VIDEO : श्रीलंकेविरुध्दच्या पराभवानंतर चाहत्याने दिला सरफराजच्या पोस्टरला लाथाबुक्यांचा प्रसाद
हेही वाचा - संजू सॅमसनने ठोकले द्विशतक, धोनी धवनसह अनेक दिग्गजांना टाकले मागे