ETV Bharat / sports

कोणालाही करता आला नाही 'असा' मॅक्सवेल-कॅरीचा ऐतिहासिक पराक्रम! - एकदिवसीयमधील सर्वाधिक धावांची भागिदारी न्यूज

क्रिकेटची सुरूवात झाल्यापासून, आजघडीपर्यंत ४ हजार २६१ एकदिवसीय सामने खेळली गेली आहेत. यात अ‌ॅलेक्स कॅरीने सहाव्या तर ग्लेन मॅक्सवेलने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत शतक झळकावले. असा कारनामा कोणत्याही जोडीला करता आलेला नाही.

eng vs aus 3rd odi : maxwell and carey tons 212 runs highest partnership for the 6 th wicket
4261 ODI सामन्यात 'असे' पहिल्यादांच घडलं, मॅक्सवेल-कॅरीचा ऐतिहासिक पराक्रम
author img

By

Published : Sep 17, 2020, 1:36 PM IST

मुंबई - विश्वविजेता इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत २-१ अशी धूळ चारली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल आणि अ‌ॅलेक्स कॅरी या जोडीने अशक्यप्राय वाटणारा विजय, ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला. या दोघांनी एक भन्नाट विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंतच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम कोणालाही करता आलेला नाही.

क्रिकेटची सुरूवात झाल्यापासून, आजघडीपर्यंत ४ हजार २६१ एकदिवसीय सामने खेळली गेली आहेत. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड या संघांनी चांगली कामगिरी केली आहे. पण नुकताच पार पडलेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात इंग्लंडने दिलेले ३०३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३ गडी आणि २ चेंडू राखत पूर्ण केले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ९० चेंडूत १०८ धावांची तर अ‌ॅलेक्स कॅरीने ११४ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. यात कॅरी सहाव्या तर ग्लेन मॅक्सवेल सातव्या स्थानावर फलंदाजीला आला होता.

क्रिकेट इतिहासात या सामन्यापूर्वी म्हणजे तब्बल ४ हजार २६० एकदिवसीय सामन्यात, १४ फलंदाजांनी ६ किंवा पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत शतकं झळकावली आहेत, ज्यात संघाचा विजय झाला आहे. म्हणजे जवळपास ३०४ एकदिवसीय सामन्यानंतर असे एखादे शतक पाहायला मिळाले आहे. परंतू ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यात दोन फलंदाजांनी सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत शतकं झळकावली आणि संघाने सामना जिंकला. हा पराक्रम आतापर्यंत कोणत्याही संघाला करता आला नाही.

याशिवाय सहाव्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक भागीदारी करण्याचा विक्रम आता मॅक्सवेल-कॅरी या जोडीच्या नावावर जमा झाला आहे. त्यांनी यापूर्वी २००७मध्ये ब्रँडन मॅक्क्युलम व क्रेग मॅकमिलन यांनी केलेला विक्रम मोडला आहे. मॅक्क्युलम-मॅकमिलन या जोडीने सहाव्य गड्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६५ धावांची भागीदारी केली होती. मॅक्सवेल-कॅरी या जोडीने २१२ धावांची भागिदारी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ने जिंकली. मॅक्सवेल सामनावीर आणि मालिकावीर ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.