दुबई - कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्याचे राजस्थान रॉयल्सचे मनसुबे आहे. तर दुसरीकडे कोलकाता विजय मिळवून प्ले ऑफसाठी इतर संघाच्या कामगिरीवर डोळे ठेऊन आहे. उभय संघात आज सायंकाळी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना होत आहे.
राजस्थानचा 'रॉयल्स' खेळाडू फॉर्मात -
राजस्थानचा संघ कोलकातावर मोठा विजय मिळवण्याच्या उद्देशाने खेळ करेल. त्यांचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सूर गवसला आहे. याशिवाय संजू सॅमसन देखील फार्मात आला आहे. याशिवाय कर्णधार स्टिव्ह स्मिथ, रॉबिन उथप्पा, जोस बटलर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चरने भेदक मारा केला आहे.
... विजय मिळाला तरीदेखील कोलकाताची वाट बिकटच -
दुसरीकडे कोलकाताची प्ले ऑफची वाट बिकट आहे. कारण त्यांचा नेट रनरेट खराब आहे. त्यांनी जर आज राजस्थानवर विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील. पण त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष्य ठेऊन राहावे लागेल. शुबमन गिल, नितीश राणा, इयॉन मॉर्ग फलंदाजीत चांगली कामगिरी नोंदवत आहेत. तर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने आपली छाप सोडली आहे. पण त्यांचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स महागडा ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ -
जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाई, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कण्डेय, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुबमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नरेन, निखिल नाइक, टॉम बँटन आणि टिम सिफर्ट.