ETV Bharat / sports

IPL २०२० CSK vs RCB : चेन्नईसमोर बंगळुरूचे कडवे आव्हान - बंगळुरू टीम टुडे

आयपीएल २०२० मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात होणार आहे.

DREAM 11 IPL 2020, MATCH 25 CSK VS RCB PREVIEW
IPL २०२० CSK vs RCB : चेन्नईसमोर बंगळुरूचे कडवे आव्हान
author img

By

Published : Oct 10, 2020, 1:00 PM IST

दुबई - आयपीएल २०२० मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला फलंदाजांची चिंता सतावत आहे. तर दुसरीकडे विराटची डोकेदुखी गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे वाढलेली आहे.

चेन्नईचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. चेन्नईला झालेल्या आपल्या ६ सामन्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आला आहे. चार सामने त्यांनी गमावले आहेत. यामुळे आजचा सामना जिंकून ते विजयी लय प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहेत. केकेआरविरुद्धच्या सामन्यात संथ फलंदाजीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या केदार जाधवला वगळले तर ऋतुराज गायकवाड किंवा एन. जगदीशन यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. फाफ ड्यु प्लेसिस, शेन वॉटसन सातत्याने धावा करत आहेत. पण मागील दोन सामन्यात अंबाटी रायुडू अपयशी ठरला आहे. शिवाय कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह रवींद्र जडेजा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. गोलंदाजीमध्ये ड्वेन ब्राव्होसह चेन्नईचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत.

दुसऱ्या बाजूचा विचार करता कर्णधार विराट कोहलीला सूर गवसला आहे. यामुळे बंगळुरूची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवा देवदत्त पडिक्कल व अनुभवी एबी डिव्हिलियर्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. मधल्या फळीत शिवम दुबे चांगली फटकेबाजी करत आहे. पण गोलंदाजीमध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. मोहम्मद सिराज व नवदीप सैनी महागडे ठरले आहेत.

  • आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो चेन्नईचा संघ -
  • फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, ऋतुराज गायकवाड महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) ड्वेन ब्राव्हो, रविंद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, कर्ण शर्मा
  • आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो बंगळुरूचा संघ -
  • अ‌ॅरोन फिंच, देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार) , गुरकीरत मान, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, वाशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, इसुरु उडाना आणि नवदीप सैनी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.