मुंबई - लॉकडाऊनमुळे घरीच असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो टिक टॉक व्हिडिओ करुन चाहत्याचे मनोरंजन करत आहे. टिक टॉकवर पदार्पण केल्यापासून वॉर्नर रोज एक तरी व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्याला याकामी त्याच्या मुली व पत्नीचीही साथ मिळत आहे. यावेळीही त्याने दोन धमाकेदार व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तो सुपरहिरो थॉरच्या अवतारात दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने दाक्षिणात्य हिरो ज्युनिअर एनटीआर याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वॉर्नरने दोन व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात तो अॅव्हेंजर पात्र थॉरच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याप्रमाणे सुपरहिरो थॉर अॅव्हेंजर्स चित्रपटात आपला हतोडा उचलतो त्याप्रमाणे या व्हिडीओमध्ये डेव्हिड क्रिकेट बॅट उचलताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसऱ्या व्हिडिओतून वॉर्नरने तिची पत्नी कँडीससोबत डान्स करून दाक्षिणात्य हिरो ज्युनिअर NTR याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं ज्युनिअर एनटीआरला शुभेच्छा देताना कँडीससह 'पक्का लोकल' या गाण्यावर डान्स केला. दरम्यान हे दोनही व्हिडिओ वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.
हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट
हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ