नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. अनेक लोक मी धर्म बदलावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत. हिंदू असल्याचा मला गर्व असल्याचेही तो म्हणाला.
-
Many people like you tried to change my religion, but did not succeed. https://t.co/p260TxmFUL
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Many people like you tried to change my religion, but did not succeed. https://t.co/p260TxmFUL
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 30, 2020Many people like you tried to change my religion, but did not succeed. https://t.co/p260TxmFUL
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 30, 2020
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर शोएबच्या वक्तव्याला दानिश कनेरियाने दुजोराही दिला होता. त्यानंतर आता दानिश कनेरियाने मी धर्म बदलावा यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचे ट्वीट केले आहे.
अमना गुल नावाच्या एका महिलेने कनेरियाने इस्लाम धर्म स्वीकारावा, इस्लाम धर्म म्हणजे सोनं आहे. इस्लामशिवाय जीवन व्यर्थ आहे, अशा आशयाचे ट्वीट केले होते. याला दानिश कनेरियाने उत्तर दिले आहे.