ETV Bharat / sports

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न - क्रिकेट

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी कलाकारांच्या ‘महाराष्ट्र क्रिकेट लीगच्या’ पहिल्या सामन्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. दादोजी

यरागा
author img

By

Published : Feb 2, 2019, 12:00 AM IST

ठाणे - आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर आधारित तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी कलाकारांच्या ‘महाराष्ट्र क्रिकेट लीगच्या’ पहिल्या सामन्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनान गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या मैदानात रणजी सामने खेळविण्यासाठी आवश्यक असलेली खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यंदाच्या आयपीएलच्या सामन्यातील काही संघ या मैदानात सराव करणार असून कोलकत्ता नाईट रायडरची टीम पुढच्या आठवड्यात तीन दिवस या मैदानात सराव करणार आहे.

दादोजी कोंडदेव स्टेडियममधील क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली आहे. मैदानात ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी सध्या मैदानात ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले असून पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येऊन हवा तितकाच पाणीपुरवठा करतात. मैदानात एक मुख्य खेळपट्टी व सरावासाठी तीन खेळपट्या तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिसऱ्या पंचांसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

undefined

पहिला सामना मुंबईचे मावळे व बाणेदार ठाणे यांच्यात झाला यामध्ये बाणेदार ठाणे संघ विजयी झाला. दुसऱ्या सामना खतरनाक मुळशी विरुद्ध मीडिया लढावय्या यांच्यात पार पडला. यामध्ये खतरनाक मुळशी संघ विजयी झाला. तर, अंतिम सामना मुंबईचे मावळे व मीडिया लढावय्या यांच्यात झाला. यामध्ये मीडिया लढावय्या संघ विजयी झाला. या ३ सामन्यात मीडिया लढवय्याचा अनिकेत पाटील , बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर, तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून पुरस्कार देण्यात आले.

Intro:दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न

महाराष्ट्र सेलिब्रेटी क्रिकेट लीगला दमदार सुरुवातBody:

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर आधारित तयार करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह नुतनीकृत खेळपट्टीचे उद्घाटन आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मराठी सिनेनाट्य कलाकारांच्या ‘महाराष्ट्र क्रिकेट लीगच्या’ पहिल्या सामन्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार अँड.निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती दिपक वेतकर, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पूजा करसुळे,नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला पिंपळोलकर, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा रागिनी बैराशेट्टी, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष सिध्दार्थ ओवळेकर, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले,भाजपा महिला आघाडीच्या माधवी नाईक, माजी क्रिकेटपट्टू राजू कुलकर्णी, मुंबई रणजी क्रिकेट संघाचे कर्णधार अभिषेक नायर,माजी क्रिकेटपट्टू तुकाराम सुर्वे, नगरसेविका नम्रता कोळी, पल्लवी क़दम, जयश्री डेव्हीड, नगरसेवक सुनील हंडोरे, सुधीर कोकाटे, अशोक वैती, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन, , नगर अभियंता राजन खांडपेकर,उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी,अशोक बुरपल्ले,मनीष जोशीं,क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालेकर, दिग्दर्शक विजू माने, अभिनेता मंगेश देसाई, अभिनेता सिद्धार्थ जाधव,आकाश पेंढारकर, संदीप जुवाटकर, मुंबई रणजी क्रिकेट संघातील अक्षय सरदेसाई, महाराष्ट्र क्रिकेट संघातील अक्षय पालकर, रेल्वे संघाचा विद्याधर कामत आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या मैदानात रणजी सामने खेळविण्यासाठी आवश्यक असलेली खेळपट्टी आणि मैदान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनावर तयार करण्यात आलेली दर्जेदार खेळपट्टी या मैदानात तयार झाली आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियममधील क्रिकेट मैदानासाठी ७० मीटर परिघाची सीमारेषा आखण्यात आली आहे. मैदानात ऑस्ट्रेलियातील बरमुडा गवताचे रोपण करण्यात आले आहे. मैदानात पाण्याची फवारणी करण्यासाठी सध्या मैदानात ७२ भूमिगत फवारे बसविण्यात आले असून पाण्याचा शिडकावा करायचा असेल तेव्हा ते जमिनीतून आपोआप वरती येऊन हवा तितकाच पाणीपुरवठा केला जातो. मैदानात एक मुख्य खेळपट्टी व सरावासाठी तीन खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य खेळपट्टीजवळ तिसऱ्या पंचांसाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यंदाच्या आयपीएलच्या सामन्यातील काही संघ या मैदानात सराव करणार असून कोलकत्ता नाईट रायडरची टीम पुढच्या आठवड्यात तीन दिवस या मैदानात सराव करणार आहे.
आजच्या दिवसाचा पहिला सामना मुंबईचे मावळे व बाणेदार ठाणे यांच्यात झाला यामध्ये बाणेदार ठाणे संघ विजयी झाला.दुसऱ्या सामना खतरनाक मुळशी विरुद्ध मीडिया लढावय्या यांच्यात पार पडला.यामध्ये खतरनाक मुळशी संघ विजयी झाला.तर अंतिम सामना मुंबईचे मावळे व मीडिया लढावय्या यांच्यात झाला.यामध्ये मीडिया लढावय्या संघ विजयी झाला.या तीन सामन्यात मीडिया लढवय्याचा अनिकेत पाटील , बाणेदार ठाणेचा संदीप जुवाटकर,तर खतरनाक मुळशीचा उदय पाटील यांना 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून पुरस्कार देण्यात आले.
आज झालेल्या स्पर्धेत विजय केंकरे, राजेश शृंगारपुरे, संजय नार्वेकर, प्रथमेश परब, प्रविण तरडे, विजय आंदळकर, अमित भंडारी आदी सिनेनाट्य कलाकार सहभागी होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.