मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गुडगे टेकले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत आटोपला. यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन या दोघांनी अनुक्रमे ४ आणि ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने अश्विनसह सिराजचे कौतूक केले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना बुमराह म्हणाला की, 'आजचा दिवस आमच्यासाठी चांगला होता. जेव्हा आम्ही गोलंदाजी करत होतो तेव्हा खेळपट्टी ओलसर होती. यामुळे मी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यात यशस्वी ठरलो.'
आजच्या दिवशी अश्विनने चांगली गोलंदाजी केली. त्याला पहिल्या दिवशी चांगला टर्न आणि रिवोल्यूशन मिळत होता. याशिवाय मोहम्मद सिराजने देखील चांगले प्रदर्शन केले. आशा आहे की, आम्ही ही कामगिरी पुढे देखील कायम ठेऊ, असे देखील बुमराहने सांगितलं.
दरम्यान, मागील वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात देखील भारतीय संघाने बॉक्सिंड डे कसोटी सामना खेळला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतली होते. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यावेळी देखील बुमराह शानदार लयीत गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया
हेही वाचा - NZ vs PAK : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, विल्यमसन शतकाच्या जवळ