मेलबर्न - आयपीएलच्या २०२० लिलावात सगळ्यात पहिली बोली लागलेल्या ख्रिस लिनने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेमध्ये दणकेबाज खेळी केली. त्याने ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळताना ३५ चेंडूत ९४ धावा चोपल्या.
ब्रिस्बेन हिट आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात लिनने ४ चौकार आणि ११ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २६८ इतका होता. लिनने आपले अर्धशतक २० चेंडूत पूर्ण केले. लिनची वादळी खेळी पाहून तो बिग बॅशमधील सर्वात वेगवान शतक ठोकणार असे वाटत होते. तेव्हा गोलंदाज मनेंटीच्या चेंडूवर तो बाद झाला.
लिन कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, या वर्षी कोलकाताने त्याला 'रिलीज' केले. यामुळं १९ डिसेंबरच्या लिलावात त्याच्यावर बोली लागली. मुंबई इंडियन्सने त्याला २ करोडी रुपयाच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले.
हेही वाचा - पाक फलंदाजांनी केली भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
हेही वाचा - आबिद अलीची गाडी सुसाट, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच पाकिस्तानी!