सिडनी - पाकिस्तान संघातील काही खेळाडूंचा अपवाद वगळता इतरांचे इंग्लिश भाषेचे अज्ञान दिसून येते. अनेकांचे शिक्षण उर्दूमध्ये झाले असल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी बोलताना पाकिस्तानच्या खेळाडूंची नेहमीच पंचाईत होते. हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. इंग्लिश बोलण्यावरुन अनेकदा पाक खेळाडूंची फजिती झाल्याचीही पाहायला मिळाली आहे. असाच एक किस्सा मंगळवारी बिग बॅश लीगमध्ये घडला. पाक खेळाडूला भाषांतर करण्यासाठी दुसऱ्या खेळाडूची मदत घ्यावी लागली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग खेळत आहे. या लीगमध्ये त्याने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. मंगळवारी त्याने मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील लढतीत हॅटट्रिक नोंदवली. त्यानं थंडर्सच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवून पुन्हा एकदा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
- View this post on Instagram
THE MCG IS ROCKING! Haris Rauf takes a hat-trick, can you believe it?! #BBL09
">
हॅरिसने हॅटट्रिक घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडल्याने त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा पुरस्कार वितरण सोहळ्यात हॅरिसला इंग्लिस भाषांतरासाठी नेपाळचा खेळाडू संदीप लामीछानेची मदत घ्यावी लागली. दरम्यान, हॅरिसने बिग बॅश लीगमधील आतापर्यंतच्या ४ सामन्यांत १३ गडी बाद केले आहेत.
-
After his thrilling hat-trick, @HarisRauf14 is the player of the match!
— #7Cricket (@7Cricket) January 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(ft @IamSandeep25 as the translator) #BBL09 pic.twitter.com/r27gycqY6k
">After his thrilling hat-trick, @HarisRauf14 is the player of the match!
— #7Cricket (@7Cricket) January 8, 2020
(ft @IamSandeep25 as the translator) #BBL09 pic.twitter.com/r27gycqY6kAfter his thrilling hat-trick, @HarisRauf14 is the player of the match!
— #7Cricket (@7Cricket) January 8, 2020
(ft @IamSandeep25 as the translator) #BBL09 pic.twitter.com/r27gycqY6k
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटसह स्टिव्ह स्मिथला १४ कसोटी खेळणाऱ्या लाबुशेनचा धोका
हेही वाचा - SA VS ENG : बाद होईना म्हणून यष्टीरक्षकाने दिल्या फलंदाजाला शिव्या, पाहा व्हिडिओ