मेलबर्न - ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क मालिकेतून बाहेर झाला आहे. तर, १ वर्षाची बंदी पूर्ण झाल्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना संघात जागा दिली नाही.
BREAKING: Smith, Warner and Starc won't feature in the #PAKvAUS series later this month | @samuelfez https://t.co/UCXwMgLjhF
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: Smith, Warner and Starc won't feature in the #PAKvAUS series later this month | @samuelfez https://t.co/UCXwMgLjhF
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019BREAKING: Smith, Warner and Starc won't feature in the #PAKvAUS series later this month | @samuelfez https://t.co/UCXwMgLjhF
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019
पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी शेवटच्या २ सामन्यांसाठी स्मिथ-वॉर्नर उपलब्ध होते. परंतु, निवड समितीने त्यांना संघात जागा दिली नाही. दोघांवरील १ वर्षाची बंदी २८ मार्चला संपत आहे. पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया २९ मार्चला चौथा तर ३१ मार्चला पाचवा सामना खेळणार आहे. स्मिथ-वॉर्नर यांनाही दुखापत झाली होती. परंतु, दोघेही सध्या तंदुरुस्त झाले आहेत. ऑस्ट्रेलिया संघात समावेश झाला नसल्याने २३ मार्चपासून सुरू होणाऱया आयपीएल स्पर्धेत स्मिथ-वॉर्नर खेळताना दिसून येतील.
मिचेल स्टार्कला गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मांसपेशीला दुखापत झाली होती. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुनरागमन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी कोणताही बदल न करता १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
Aussie ODI squad for UAE tour: Aaron Finch (c), Pat Cummins (vc), Alex Carey (vc), Jason Behrendorff, Nathan Coulter-Nile, Peter Handscomb, Usman Khawaja, Nathan Lyon, Shaun Marsh, Glenn Maxwell, Jhye Richardson, Kane Richardson, Marcus Stoinis, Ashton Turner, Adam Zampa #PAKvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Aussie ODI squad for UAE tour: Aaron Finch (c), Pat Cummins (vc), Alex Carey (vc), Jason Behrendorff, Nathan Coulter-Nile, Peter Handscomb, Usman Khawaja, Nathan Lyon, Shaun Marsh, Glenn Maxwell, Jhye Richardson, Kane Richardson, Marcus Stoinis, Ashton Turner, Adam Zampa #PAKvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019Aussie ODI squad for UAE tour: Aaron Finch (c), Pat Cummins (vc), Alex Carey (vc), Jason Behrendorff, Nathan Coulter-Nile, Peter Handscomb, Usman Khawaja, Nathan Lyon, Shaun Marsh, Glenn Maxwell, Jhye Richardson, Kane Richardson, Marcus Stoinis, Ashton Turner, Adam Zampa #PAKvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 8, 2019
ऑस्ट्रेलिया संघ
अॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हॅन्डसकोम्ब, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन टर्नर, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा, पॅट कमिन्स, नथन कूल्टर-नाइल, अॅलेक्स केरी, नथन लायन आणि जेसन बेहरेनडोर्फ.