ETV Bharat / sports

IPL२०२०: विश्व करंडकात 'स्टंप' तोडणाऱ्या वेगवान गोलंदाजाची आयपीएलमधून माघार - आयपीएल २०२०

स्टार्कने १९ डिसेंबरला होणाऱ्या आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेतून आपले नाव माघार घेतले. दरम्यान, स्टार्कने मागील वर्षीच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती.

Aussie paceman Mitchell Starc opts out of IPL 2020
IPL2020: विश्व करंडकात 'स्टंप' तोडणाऱ्या वेगवान गोलंदाजाची आयपीएलमधून माघार
author img

By

Published : Dec 3, 2019, 5:32 PM IST

Updated : Dec 3, 2019, 5:51 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेत आपल्या वेगवान गोलंदाजीने, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केलेला ऑस्ट्रेलियाचा 'तेजतर्रार' गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएल २०२० मधून माघार घेतली आहे. स्टार्कने १९ डिसेंबरला होणाऱ्या आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेतून आपले नाव माघार घेतले. दरम्यान, स्टार्कने मागील वर्षीच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती.

मिचेल स्टार्कने मागील वर्षी आयसीसी विश्वकरंडक २०१९ स्पर्धेच्या तयारीसाठी आयपीएलमधून माघार घेतली होती. विश्वकरंडक स्पर्धेत स्टार्क ऑस्ट्रेलिया संघाचा हुकमी एक्का ठरला. त्याने या विश्वकरंडक स्पर्धेत १० सामन्यात २७ गडी बाद केले. या कामगिरीसह तो एका विश्वकरंडकात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच मॅकग्राच्या नावे होता. त्याने २००७ च्या विश्वकरंडकात २६ गडी बाद केले होते.

Aussie paceman Mitchell Starc opts out of IPL 2020
मिचेल स्टार्क...

आयपीएल स्पर्धेत मिचेल स्टार्कने शेवटचा सामना २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्यानंतर २०१८ च्या आयपीएल हंगामात त्यांचा समावेश कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. मात्र, त्याला या हंगामातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. स्टार्कने आयपीएलमध्ये २७ सामने खेळली असून त्याने ३४ गड्यांना तंबूत माघारी धाडले आहे. १५ धावांवर ४ गडी बाद हे स्टार्कचे सर्वश्रेष्ठ आयपीएल प्रदर्शन आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या मोसमासाठी एकूण ९७१ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी एक निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ होती. आता या महिन्याच्या १९ तारखेला कोलकातामध्ये लिलाव होणार आहे.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या अशा एकूण १९ भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या अशा ६३४ अशा भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तर, ६० खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलचा अनुभव आहे मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचा अनुभव नाही. या लिलावामधून स्टार्कने माघार घेतली आहे.

आयपीएल २०२० लिलावासाठी ऑस्ट्रेलियाचे ५५, दक्षिण आफ्रिकेचे ५४, श्रीलंकाचे ३९, न्यूझीलंडचे २४, इंग्लंडचे २२, वेस्ट इंडीजचे ३४, अफगाणिस्तानचे १९, बांग्लादेशचे ६, झिम्बाब्वेचे ३, नेदरलँड्स व अमेरिकेचा प्रत्येकी एक इत्यादी खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा - मनीष पांडेची नवी इनिंग.. 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत अडकला लग्नाच्या बेडीत

हेही वाचा - थरारक!..शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात कर्नाटक विजयी

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Dec 3, 2019, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.