मेलबर्न - ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाविरोधातील बॉक्सिंग डे कसोटी २४७ धावांनी जिंकली आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने चपळता दाखवत फलंदाजाला यष्टीचित केले. पेनची चपळता पाहून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी चपळाईने यष्टीरक्षण करण्यासाठी ओळखला जातो. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोनी यष्ट्या उडवतो. असाच यष्टीरक्षणाचा नजारा मेलबर्नच्या मैदानावर पाहायला मिळाला.
बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४८८ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने सुरुवातीचे ३ फलंदाज अवघ्या ३५ धावांमध्ये परतले. यानंतर हेन्री निकोल्स फलंदाजीला आला आणि त्याने टॉम ब्लंडेल याच्यासोबत न्यूझीलंडचा डाव सारवला. मात्र डावाच्या तिसाव्या षटकामध्ये फिरकी गोलंदाज नॅथन लियोनच्या गोलंदाजीवर तो फसला आणि टिम पेनने चफळाईने त्याला यष्टीचित केले.
-
Sharp work from the skipper to send back Henry Nicholls 👌
— ICC (@ICC) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Australia are six wickets away from a win. #AUSvNZpic.twitter.com/0mOvRP6vlY
">Sharp work from the skipper to send back Henry Nicholls 👌
— ICC (@ICC) December 29, 2019
Australia are six wickets away from a win. #AUSvNZpic.twitter.com/0mOvRP6vlYSharp work from the skipper to send back Henry Nicholls 👌
— ICC (@ICC) December 29, 2019
Australia are six wickets away from a win. #AUSvNZpic.twitter.com/0mOvRP6vlY
टिम पेनची चपळता पाहून नेटिझन्सला धोनीची आठवण आली. दरम्यान, न्यूझीलंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाचे ४८८ धावांचे आव्हान न्यूझीलंडला झेपले नाही. त्याचा संपूर्ण संघ २४० धावांवर आटोपला. टॉम ब्लंडेलने २१० चेंडूत १२१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला निकोल्स वगळता दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिओन (४/८१), जेम्स पॅटिन्सन (३/३५) आणि मार्नस लाबुशेन (१/११) ने बळी घेतले. दरम्यान, उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेती पहिले दोनही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना सिडनीच्या मैदानात ३ ते ७ जानेवारी या दरम्यान, खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाने 'Boxing Day Test' कसोटीसह मालिका जिंकली
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा क्रिकेटला रामराम