दिल्लीच्या मैदानात बसवण्यात येणार अरुण जेटलींचा पुतळा - अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम न्यूज
जेटली हे १४ वर्ष डीडीसीएचे अध्यक्ष होते. आता त्यांचा मुलगा रोहन जेटली डीडीसीएचे अध्यक्ष आहेत. जेटली यांचा पुतळा राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार ललित कला प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते तयार होईल.

नवी दिल्ली - दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) माजी अध्यक्ष अरुण जेटली यांचा पुतळा बसवला जाणार आहे. जेटलींच्या ६८व्या जयंतीनिमित्त सहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाईल. गृहमंत्री अमित शाह स्वत: पुतळ्याचे अनावरण करतील.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाकडे तगडी फलंदाजी आहे - लँगर
जेटली हे १४ वर्ष डीडीसीएचे अध्यक्ष होते. आता त्यांचा मुलगा रोहन जेटली डीडीसीएचे अध्यक्ष आहेत. जेटली यांचा पुतळा राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार ललित कला प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते तयार होईल. या दोन कंपन्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच सरदार पटेल पुतळा तयार केला. स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाच्या या पुतळ्याची उंची ५९७ फूट आहे.
अनिल सुतार यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना जेटलींच्या पुतळ्याच्या तयारीला दुजोरा दिला. ऑक्टोबर महिन्यात डीडीसीएच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत स्टेडियममध्ये जेटलींचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले. हे स्टेडियम १९९३ मध्ये बांधले गेले.