मुंबई - आयपीएलमधील १२ वर्षाच्या इतिहासात काही फलंदाजांनी एकेरी दुहेरी धावा काढण्यावर भर दिला नाही तर चौकार षटकार खेचण्याला पसंती दिली. यात विंडीजचे खेळाडू आघाडीवर आहेत. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ७०० पेक्षा जास्त वेळा चेंडू सीमारेषा पार धाडला आहे. पण या आयपीएलमध्ये असा एक खेळाडू आहे जो प्रत्येक सहा चेंडूनंतर षटकार खेचतो. आंद्रे रसेल असे त्या खेळाडूचे नाव आहे.
आंद्रे रसेल हा असा फलंदाज आहे जो सिक्सर किंग ख्रिस गेल यालाही पाठीमागे टाकले आहे. ख्रिस गेल प्रत्येकी ९ चेंडूनंतर षटकार मारतो. या यादीत ग्लेन मॅक्सवेल आणि हार्दिक पंड्याचे देखील नाव आहे. जे प्रत्येक १० चेंडूनंतर षटकार मारतात.
आंद्रे रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये ५० षटकार खेचले आहेत. केकेआरच्या संघाकडून खेळताना त्याने ११ सामन्यात ४८६ धावा केल्या आहेत. त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. ख्रिस गेलने ३२ षटकार ठोकले आहे. त्याची ही कामगिरी पाहून विंडीज संघाने त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले आहे. भारताच्या हार्दिक पंड्याने २७ षटकार खेचले आहेत.