सेंचुरियन - २००७ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरूद्ध त्याने ही कामगिरी नोंदवली होती. आज याच ब्रॉडने आफ्रिकेविरूद्धच्या कसोटीत महत्वाचा विक्रम नोंदवला. या दशकात स्टुअर्ट ब्रॉड ४०० कसोटी बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडच्या अगोदर, जेम्स अँडरसनने हा महत्त्वाचा टप्पा गाठला होता. येथील सुपरस्टोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ब्रॉडने या विक्रमाला गवसणी घातली.
-
Most wickets in the 2010s in Test cricket. By dismissing Faf du Plessis, Stuart Broad became the second bowler, after Jimmy Anderson, to take 400 Test wickets in the 2010s https://t.co/Qkyq2etTvj pic.twitter.com/HCfZMBrs6F
— Manish Thapa (@themansport) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Most wickets in the 2010s in Test cricket. By dismissing Faf du Plessis, Stuart Broad became the second bowler, after Jimmy Anderson, to take 400 Test wickets in the 2010s https://t.co/Qkyq2etTvj pic.twitter.com/HCfZMBrs6F
— Manish Thapa (@themansport) December 26, 2019Most wickets in the 2010s in Test cricket. By dismissing Faf du Plessis, Stuart Broad became the second bowler, after Jimmy Anderson, to take 400 Test wickets in the 2010s https://t.co/Qkyq2etTvj pic.twitter.com/HCfZMBrs6F
— Manish Thapa (@themansport) December 26, 2019
हेही वाचा - हिंदू होता म्हणून पाकचे खेळाडू 'त्याला' त्रास द्यायचे; शोएब अख्तरने केली पोलखोल
यजमान संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला २९ धावांवर बाद करत ब्रॉडने या विक्रमाच्या यादीत स्वत:ला समाविष्ट केले. ब्रॉड आणि अँडरसननंतर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने या दशकात आतापर्यंत एकूण ३७६ बळी घेतले आहेत. याशिवाय श्रीलंकेच्या रंगाना हेराथने ३६३ बळी मिळवले आहेत. या दशकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटीत ४२८ बळी मिळवले आहेत.
भारताच्या फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या दशकात कसोटीत ३६२ बळी घेतले आहेत.