दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२०मध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये ८६ संघ १५ स्थानांसाठी स्पर्धा करणार आहेत.
हेही वाचा - क्रिकेटपटू ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्सची होणार चौकशी
हे सामने १३ महिन्यांपर्यंत चालतील, ज्यामध्ये २२५ सामने खेळले जातील. पुढील वर्षी ही प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होईल. कोरोनामुळे पाच क्षेत्रांतील ११ प्रादेशिक पात्रता स्पर्धा २०२१ मध्ये निश्चित करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा यंदा खेळली जाणार होती.
जपान प्रथमच पुरुष टी-२० विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करणार आहे. प्रादेशिक स्तरावर ६७ सहयोगी सदस्य भाग घेतील. ही स्पर्धा संघांना रँकिंगमध्ये सुधारणा करण्याची संधी देईल. यात हंगेरी, रोमानिया आणि सर्बियाचे संघ पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भाग घेतील. या स्पर्धेचे सर्व सामने कोरोनाच्या नियमांतर्गत खेळले जातील.