गॉल - इंग्लंडटचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर हा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, तेथे कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
श्रीलंकेच्या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गॉल जिल्हा आरोग्य सेवा संचालकांनी याबाबत वृत्त दिले आहे. लाइटहाउस हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग असल्याचे संचालकांनी सांगितले.
या प्रकरणानंतर ईसीबीचे प्रवक्ते म्हणाले, "आम्हाला काळजी नाही. आमचे प्रोटोकॉल चांगले आहेत आणि आम्ही देखरेख करत राहू. जागतिक क्रिकेटमधील आम्ही सर्वात आज्ञाधारक संघ आहोत. कोविड अधिकारी असलेला आम्ही एकमेव संघ आहे. आम्ही कोविडच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करतो. आम्ही श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतो आणि आम्ही आमच्या खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी काहीही करू."
हेही वाचा - गाबा कसोटी : ३६९ धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव