बार्सिलोना - भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, समीर वर्मा आणि अजय जयराम यांनी बार्सिलोना स्पेन मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सायनाने गुरुवारी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या मारिया उलितिनाचा २१-१०, २१-१९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा सामना आता तिसऱ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानशी होईल.
हेही वाचा - भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा क्रिकेटमधून निवृत्त
पुरुष एकेरीत समीरने अंतिम-१६ च्या सामन्यात जर्मनीच्या काई शेफरचा २१-१४, १६-२१, २१-१५ असा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर जयरामने उपउपांत्यपूर्व फेरीत तृतीय मानांकित किदांबी श्रीकांतचा २१-६, २१-१७ असा पराभव करून अंति -८ मध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत जयरामचा सामना फ्रान्सच्या थॉमस रोक्सेलशी होईल.