मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटपटू सायना नेहवाल आणि पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणय या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे ते आजपासून सुरू होत असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेली सायना, थायलंड ओपन स्पर्धा खेळण्यासाठी बँकॉकमध्ये होती. तिची स्पर्धेआधी तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. सायनाने चाचणीदरम्यानचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
-
3rd COVID test here in bangkok 😢😢... The tournament starts tomorrow 👍👍 #bangkok #Thailandopen #tournament #badminton pic.twitter.com/Lc5c7YZkQa
— Saina Nehwal (@NSaina) January 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">3rd COVID test here in bangkok 😢😢... The tournament starts tomorrow 👍👍 #bangkok #Thailandopen #tournament #badminton pic.twitter.com/Lc5c7YZkQa
— Saina Nehwal (@NSaina) January 11, 20213rd COVID test here in bangkok 😢😢... The tournament starts tomorrow 👍👍 #bangkok #Thailandopen #tournament #badminton pic.twitter.com/Lc5c7YZkQa
— Saina Nehwal (@NSaina) January 11, 2021
एचएस प्रणय देखील थायलंड ओपन खेळण्यासाठी बँकॉकमध्ये होता. त्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. यानंतर दोघांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. तसेच दोघांना थायलंड ओपन स्पर्धेतून माघार घेण्यासही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार, थायलंडमध्ये सायनाचा दुसऱ्यांदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आठवड्याभरापूर्वी सायनाने कोरोनावर मात करत पुन्हा सराव सुरु केला होता. आता स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या तिसऱ्या कोरोना चाचणीमध्ये सायनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा 'या' अभिनेत्याशी साखरपूडा, फोटो व्हायरल
हेही वाचा - थायलंड ओपन २०२१ : १० महिन्यानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरणार सिंधू-सायना