ETV Bharat / sports

न्यूझीलंड ओपन : क्वार्टर फायनलमध्ये एच. एस. प्रणॉयचा पराभव,  भारताचे आव्हान संपुष्टात - कांटा सुनेयामा

जपानच्या कांटा सुनेयामाने न्यूझीलंड ओपनच्या सेमी फायनलमध्ये मारली धडक

एच. एस. प्रणॉय
author img

By

Published : May 4, 2019, 2:35 PM IST

ऑकलंड (न्यूझीलंड) - न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का बसला आहे. प्रणॉयच्या या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या पाचव्या मानांकित कांटा सुनेयामाने प्रणॉयचा २१-१७,१५-२१,१४-२१ असा पराभव केला. या विजयासह कांटाने न्यूझीलंड ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

एक तास, १३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयने २१-१७ ने पहिला गेम जिंकत सामन्यात आघाडी घेतली होती मात्र, अखेरचे २ गेम कांटाने २१-१५, २१-१४ असे जिंकत जोरदार पुनरागमन करत सामना आपल्या नावावर केला.

न्यूझीलंड ओपनमध्ये यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये पुरुष ऐकेरीच्या दुसऱ्या फेरीत बी. साई प्रणितचा तर महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला होता. तसेच मनू आणि सुमित या भारतीय जोडीच्या पराभवानंतर भारताचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.