मुंबई - जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) कोरोना विषाणूच्या फैलावामुळे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरसह बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा १२ एप्रिलपर्यंत स्थगित केल्या आहेत. बीडब्ल्यूएफच्या या निर्णयाने नवी दिल्ली येथे २४ ते २९ मार्च यादरम्यान होणारी इंडिया ओपन स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे.
बीडब्ल्यूएफने या विषयी सांगितले की, याची अंमलबजावणी रविवारी संपणाऱ्या ऑल इंडिया ओपन स्पर्धेनंतर म्हणजे सोमवारपासून केली जाणार आहे. दरम्यान, बीडब्ल्यूएफने सर्व सदस्यांच्या संमतीने हा निर्णय घेतला असल्याचेही बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले आहे.
बीडब्ल्यूएफच्या निर्णयामुळे स्विस ओपन, इंडिया ओपन, आर्लीनस मास्टर्स, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन या स्पर्धा नियोजित वेळेत होणार नाहीत.
चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा फैलाव जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. या विषाणूमुळे जगभरातील ५ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही याचा प्रसार झाला असून १०० हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
खेळाडू, सदस्य आणि अधिकारी यांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे बीडब्ल्यूएफने फेडरेशनने सर्व स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - आयपीएलबाबत 'दादा'चे मोठे वक्तव्य, म्हणाला...
हेही वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी रोनाल्डोचा पुढाकार; पोर्तुगालमधील हॉटेल्स उपचारांसाठी केली खुली