ETV Bharat / sitara

....अखेर विवेकने 'ते' ट्विट डिलीट करून मागीतली माफी - twit

विवेकच्या ट्विटनंतर अभिनेत्री सोनम कपूर तसेच सोशल मीडिया युझर्सनी विवेकला धारेवर धरले होते. अमिताभ बच्चन यांनीही अप्रत्यक्षरित्या विवेकला सोशल मीडियावरून फटकारले.

....अखेर विवेकने 'ते' ट्विट डिलीट करून मागीतली माफी
author img

By

Published : May 21, 2019, 10:36 AM IST

Updated : May 21, 2019, 12:51 PM IST

मुंबई - विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायसंबधी केलेले ट्विट डिलीट करून जाहिर माफी मागीतली आहे. एक्झिट पोलचा संदर्भ देत ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर असलेले एक मीम त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये वादंग निर्माण झाले होते.

विवेकच्या ट्विटनंतर अभिनेत्री सोनम कपूर तसेच सोशल मीडिया युझर्सनी विवेकला धारेवर धरले होते. अमिताभ बच्चन यांनीही अप्रत्यक्षरित्या विवेकला सोशल मीडियावरून फटकारले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही सोशल मीडियावर विवेकचे हे ट्विट अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. तसेच राज्य महिला आयोगानेही या ट्विटची दखल घेत विवेकला नोटीस बजावली होती.

सुरुवातीला माफी मागण्यास साफ नकार देणाऱ्या विवेकने 'आधी मी काय चुकीचे केले ते सांगा, नंतर माफी मागतो', अशी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. यामुळे विवेकने आता ते ट्विटच डिलीट करून सर्वांची माफी मागीतली आहे.

'मी नेहमी स्त्रियांचा आदर करतो. मागच्या १० वर्षांपासून मी महिला सशक्तीकरणासाठी कार्य करतो. एखाद्या स्त्रीचा अपमान करणे, याचा विचारही मी करू शकत नाही. जर माझ्या या ट्विटमुळे कोणाचे मन दुखावले असेल, तर मी माफी मागतो', असे म्हणत त्याने हे ट्विट डिलीट केले आहे.

काय होते विवेकचे ट्विट -

विवेक ओबेरॉयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या सलमान खान, विवेक आणि अभिषेकसोबत दिसत आहे. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर हा मीम आहे. यामध्ये ऐश्वर्या-सलमानला ओपिनियन पोल, ऐश्वर्या-विवेकला ऐक्झिट पोल आणि ऐश्वर्या-अभिषेक यांच्या जोडीला रिझल्ट दाखवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करून विवेकने यावर कॅप्शनही दिले आहे. 'क्रिएटिव्ह, इथे कोणतेच राजकारण नाही, हेच आयुष्य आहे', असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे.

Intro:Body:

ASDAS

Conclusion:
Last Updated : May 21, 2019, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.