मुंबई - मराठी दैनंदिन मालिकांमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळंच महत्त्व असतं. त्यामुळे प्रत्येक सणानिमित्त सादर होणारे एपिसोड फारच स्पेशल असतात. असंच काहीसं 'झी युवा' या वाहिनीवर सुरू असलेल्या 'वर्तुळ' या मालिकेत होणार आहे. यंदा होळीनिमित्त या मालिकेचा खास एपिसोड सादर होणार असून त्यातून या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
वर्तुळ मालिकेत अभिशी लग्न करून मीनाक्षी त्याच्या आयुष्यात आली खरी मात्र तिच्या भूतकाळाबद्दल त्याला काहीच माहीत नाही. अशात मीनाक्षीचा आधीचा नवरा नव्या रुपात आता परतणार आहे. पण नक्की कसा ते आम्ही या मालिकेतील कलाकार जुई गडकरी आणि विकास पाटील यांच्याकडून जाणून घेतले आहे. त्यासोबत यानिमित्ताने त्यांच्या होळीतल्या काही आठवणी या कलाकारांनी खास ई टीव्ही भारतच्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत. चला तर मग पाहुयात नक्की काय सांगतात हे कलाकार...