ETV Bharat / sitara

‘वैजू नं १’ फेम अभिनेत्री सोनाली पाटीलचे ‘देवमाणूस’मध्ये आगमन! - 'देवमाणूस' मालिकेत सरकारी वकिलाची भूमिका

अभिनेत्री सोनाली पाटील याआधी ‘वैजू नं १’ या मालिकेतून अभिनय करताना दिसली होती. आता 'देवमाणूस' या मालिकेत ती सरकारी वकिलाची भूमिका साकारतेय. एवढंच नाही तर सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे.

Sonali Patil
सोनाली पाटील
author img

By

Published : Jun 10, 2021, 7:45 PM IST

सत्य घटनेवर आधारित मालिकांमध्ये झी मराठीवरील 'देवमाणूस' ही सिरीयलची प्रेक्षकांवर घट्ट पकड बसलीय. उत्कृष्ट पटकथा आणि वास्तविक अभिनय व चित्रण यामुळे प्रेक्षकांची ही लाडकी मालिका झालीय. या मालिकेतील विलक्षण वळणं पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच आहे. ए.सी.पी. दिव्या सिंग भर लग्नाच्या मांडवातून देविसिंगची वरात थेट पोलीस स्टेशनकडे नेते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे दिव्याचं लक्ष आहे पण अजितकुमार देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही आहे. तो नक्कीच दिव्याला त्रास होईल असे वागणार आहे. त्यातच तो डॉक्टर असल्यामुळे त्याला केसमधील खाचखळग्यांची माहिती आहे. दिव्या आणि देवीसिंग यांच्यातील ‘झगडा’ पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.

अशातच आता मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ती देविसिंगला खडी फोडायला पाठवण्यासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी कोर्टात त्याच्यासोबत वादविवाद करताना दिसेल. अभिनेत्री सोनाली पाटील या सरकारी वकिलाची भूमिका साकारतेय. एवढंच नाही तर सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’ आता सरकारी वकील देवीसिंगला शिक्षा करून देण्यात यशस्वी होईल की ती देखील देविसिंगची शिकार होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

अभिनेत्री सोनाली पाटील याआधी ‘वैजू नं १’ या मालिकेतून अभिनय करताना दिसली होती. या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, "देवमाणूस या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आणि अशावेळी माझी या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेतून एंट्री झाली आहे याचा मला खूप आनंद आहे. आर्या खूप धाडसी आणि महत्वाकांक्षी आहे. ती देवीसिंग प्रकरण कशाप्रकारे हाताळते हे पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येईल."

अजितकुमार सध्या कोर्टात स्वतःची बाजू स्वतःच मांडतोय. दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टातच सादर करणार आहे.

‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - प्रतीक बब्बरची बॉलिवूडमध्ये १३ वर्षे, म्हणाला, 'रोलरकोस्टर राइड' सारखा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.