ETV Bharat / sitara

'कोण होणार करोडपती' च्या विशेष भागात येताहेत ‘अजूनही बरसात आहे' चे मुक्ता आणि उमेश!

‘अजूनही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र आलेले उमेश कामत आणि मुक्ता बर्वे प्रेक्षकांची मने जिंकताहेत. हीच मुक्ता आणि उमेश ची टीम सोनी मराठीवर सुरु असलेल्या 'कोण होणार करोडपती', च्या विशेष भागात हजेरी लावणार आहेत, प्रेक्षकांचा लाडका खेळ खेळणार आहेत. 'कोण होणार करोडपती' चा विशेष भाग ४ सप्टेंबर सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल

मुक्ता आणि उमेश
मुक्ता आणि उमेश
author img

By

Published : Sep 3, 2021, 10:38 PM IST

सोनी मराठीवर सुरु असलेली ‘अजूनही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र आलेले उमेश कामत आणि मुक्ता बर्वे प्रेक्षकांची मने जिंकताहेत. हीच मुक्ता आणि उमेश ची टीम सोनी मराठीवर सुरु असलेल्या 'कोण होणार करोडपती', च्या विशेष भागात हजेरी लावणार आहेत, प्रेक्षकांचा लाडका खेळ खेळणार आहेत. येत्या ४ सप्टेंबर, शनिवार, रात्री ९ वा. तो भाग प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे 'कोण होणार करोडपती' च्या विशेष भागामध्ये उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. समाजानी, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून मुक्ता आणि उमेश हे दोघे या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर आले आहेत.

मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'माउली सेवा प्रतिष्ठान' ही संस्था गेली पंधरा वर्षं आजारी, बेघर, बेवारस अशा महिलांना कायम स्वरूपाचे उपचार आणि निवारा देण्यासाठी 'मनगाव' हा प्रकल्प चालवते.

'कोण होणार करोडपती' चा विशेष भाग ४ सप्टेंबर सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.
हेही वाचा - सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार, दिलीप कुमार यांच्या मृत्यूने नैराश्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.