ETV Bharat / sitara

'खुदा हाफिज' चित्रपटाचा २७ डिसेंबरला टीव्ही प्रीमियर - विद्युत जामवाल

अभिनेता विद्युत जामवाल मुख्य भूमिका असलेला 'खुदा हाफिज' चित्रपटाचा प्रीमियर २७ डिसेंबर रोजी टेलिव्हिजनवर होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. मात्र आता टीव्हीच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विद्युत उत्सुक झाला आहे.

TV premiere of 'Khuda Hafeez'
'खुदा हाफिज'
author img

By

Published : Dec 22, 2020, 3:41 PM IST

मुंबई - अभिनेता विद्युत जामवाल मुख्य भूमिका असलेला 'खुदा हाफिज' चित्रपटाचा प्रीमियर २७ डिसेंबर रोजी टेलिव्हिजनवर होणार आहे. अभिनेता विद्युत म्हणाला, "'खुदा हाफिज' एका माणसाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे जो आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकतो. या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप खूष आहे. चित्रपटाचा प्रीमियर आता टेलिव्हिजनवर होतो आहे. पण मी प्रेक्षकांचा प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहे. "

'खुदा हाफिज' हा चित्रपट एका तरुण भारतीयाची कहाणी आहे, ज्याचे नुकतेच लग्न झाले आहे. त्याने करियरच्या चांगल्या संधींच्या शोधात विदेशात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. परदेशात त्याची पत्नी नर्गिस रहस्यमयपणे बेपत्ता झाल्याचे त्याला कळते आणि मग समीर, एक असहाय्य सामान्य माणसासारखा, आपल्या पत्नीला सुरक्षितपणे आपल्याबरोबर परत आणण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार होतो.

हेही वाचा - 'डॉक्टर जी'मध्ये झळकणार आयुष्यमान खुराणा, अनुराग कश्यपचे बहिण करणार दिग्दर्शन

'खुदा हाफिज' हा चित्रपट २७ डिसेंबर रोजी स्टार गोल्डवर प्रसारित होईल.

हेही वाचा - फॅन'मधील अभिनेत्री शीखा शर्माला अर्धांगवायूचा झटका, पुन्हा कधी चालू शकणार याबद्दल अस्पष्टता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.