ETV Bharat / sitara

बलात्कार प्रकरणी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - judicial custody

अश्लील व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडित तक्रादार माहिलेकडे करण सतत पैशांची मागणी करीत होता. या गोष्टीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती

करण ओबेरॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
author img

By

Published : May 9, 2019, 3:21 PM IST

मुंबई - टीव्ही कलाकार करण ओबेरॉय यास मुंबई ओशिवरा पोलिसांनी एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याप्रकरणी ६ मे रोजी अटक केली होती. याप्रकरणी आता अंधेरी न्यायालयाकडून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण -

करण ओबेरॉयने आपल्याशी २०१६ मध्ये डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली होती. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर करणने त्याच्या मुंबईतील घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर त्याने सतत आपल्याशी शरीरसंबंध ठेवून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून करण ओबेरॉय हा त्याच्याजवळील अश्लील व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडित तक्रादार माहिलेकडे सतत पैशांची मागणी करीत होता. या गोष्टीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी खंडणी आणि बलात्काराच्या गुन्ह्यात करण ओबेरॉयला ६ मे रोजी अटक केली होती.

Intro:Body:

ent 09

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.