ETV Bharat / sitara

‘राष्‍ट्रीय युवा दिन‘ बद्दल अँड टीव्‍हीवरील तरुण कलाकारांचे मनोगत! - १२ जानेवारीला स्‍वामी विवेकानंद जयंती

१२ जानेवारीला स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जयंती निमित्त राष्‍ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. जयंती निमित्त यंदाच्‍या वर्षातील केंद्राविषय 'राष्‍ट्रनिर्मितीसाठी युवा शक्‍तीला चालना देणे'शी बांधील राहात अँड टीव्‍हीवरील तरूण कलाकार यांनी आपली मते व्यक्त केली.

national-youth-day
‘राष्‍ट्रीय युवा दिन
author img

By

Published : Jan 12, 2021, 5:57 PM IST

मुंबई - १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारीला भारताचे थोर समाजसुधारक, विचारवंत आणि तत्त्वज्ञानी स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जयंती निमित्त राष्‍ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. तत्त्वज्ञानी स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जयंती निमित्त यंदाच्‍या वर्षातील केंद्राविषय 'राष्‍ट्रनिर्मितीसाठी युवा शक्‍तीला चालना देणे'शी बांधील राहात अँड टीव्‍हीवरील तरूण कलाकार , 'येशु'मधील हिरोद अंतिपस (रूद्र सोनी), 'गुडिया हमारी सभी पे भारी'मधील गुडिया (सारिका बहरोलिया) आणि 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील काटे (आश्‍ना किशोर) यांनी त्‍यांची मते व्‍यक्‍त केली.

रूद्र सोनी म्‍हणाला, ''तरूण देशाचे भविष्‍य आहेत आणि भारतीय युवा असल्‍यामुळे मला माझ्या विकासासोबत इतरांना देखील प्रोत्‍साहित करण्‍याची जबाबदारी स्विकारण्‍याचा अभिमान वाटतो. एकदा स्‍वामी विवेकानंदजी म्‍हणाले होते की शक्‍ती आपल्‍यामध्‍येच असते. मी माझ्या कार्याच्‍या माध्‍यमातून आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न करतो आणि आशा करतो की, कधीतरी भावी कलाकार माझ्याकडे आदर्श म्‍हणून पाहतील, जसे मी माझ्या वरिष्‍ठांना आदर्श मानतो.''

आश्‍ना किशोर म्‍हणाली, ''माझ्याकडून भारतीय तरूणांना आनंदमय युवा दिवसच्‍या शुभेच्‍छा! मी आशा करते की, आजचे तरूण त्‍यांच्‍या निवडलेल्‍या क्षेत्रामध्‍ये मोठी उंची गाठतील आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करतील. यंदाच्‍या युवा दिवसनिमित्त मी स्‍वामीजींच्‍या एका शिकवणीला उजाळा देते, ती म्‍हणजे 'स्‍वत:ला कमी लेखू नका'. या ध्‍येयासह यंदा मी माझ्या कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडत कोणतीही शंका न बाळगता नवीन काहीतरी करणार आहे.''

आपले मत व्‍यक्‍त करत सारिका बहरोलिया म्‍हणाली, ''स्‍वामीजींची जीवनशैली, त्‍यांची समर्पितता आणि आपण आपल्‍या स्‍वत:मध्‍येच कशाप्रकारे सकारात्‍मक बदल घडवून आणला पाहिजे याबाबत तरूणांना जागरूक करण्‍याचा युवा दिवस साजरीकरणामागील मुख्‍य उद्देश आहे. तरूण भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. माझे कार्य व कृतींच्‍या माध्‍यमातून देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्‍याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. युवा दिनाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा!''

हेही वाचा- टायगर श्रॉफने ‘कॅसानोवा‘ चा टिझर-ट्रेलर केला प्रदर्शित

तरूणांसाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य असलेला युवा दिवस म्‍हणजे देशासाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य असणार यात शंकाच नाही.

हेही वाचा- ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.