बेयर ग्रील्सने अक्षय कुमारला पाजला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा - Akshay Kumar latest news
बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार 'बेयर ग्रिल्स' सोबत त्याच्या डियर डेव्हिव्ल शो 'द वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स'मध्ये काम करणार आहे. इन्स्टाग्रामवर अक्षयने एक नवा प्रोमो शेअर केला असून यात तो हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा पिताना दिसत आहे.
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटीश साहसी बेयर ग्रील्सने त्याला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा कसा दिला हे सांगितले आहे.
'इन द वाइल्ड विथ बीअर ग्रिल्स' शोच्या पुढील भागामध्ये अक्षय जंगलात रोमांचक साहस करताना दिसणार आहे. त्याने या भागातील एक नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो हत्तींच्या विष्टेतून बनवलेल्या चहाचा आस्वाद घेताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या नव्या प्रोमोमध्ये तो दोरीच्या मदतीने नदी पार करत असताना दिसतो. मात्र, त्या नदीमध्ये हिंस्त्र मगरी आहेत. शोमध्ये भरपूर स्टंट्स असल्याचे प्रोमोतून लक्षात येते. चालत्या ट्रकमधून दोघेही जंगलात उडी मारताना दिसता. अक्षय म्हणतो, मी रिल हिरो आहे, आणि बेयर ग्रील्स रिअल हिरो आहे.
त्याने प्रोमोला कॅप्शन देत लिहिले की, "बेयर ग्रिल्स असलेल्या जंगलात, त्याला बरीच आव्हाने आली ,पण ग्रिल्सने हत्तीच्या विष्ठेने बनलेला चहा पिऊन मला चकित केले. काय दिवस होता."
कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व येथे या विशेष भागाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
अक्षयच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिळ सुपरस्टार रजनीकांत बेयर ग्रिल्स शोमध्ये हजेरी लावलेले आहेत.