ETV Bharat / sitara

‘इल्‍लीगल'च्या दुसऱ्या सिझनमध्ये तनुज विरवानीचा समावेश! - तनुज विरवानी ‘इल्‍लीगल'च्या दुसऱ्या सिझनमध्ये

वूट सिलेक्‍टची ओरिजिनल सिरीज 'इल्‍लीगल' या लक्षवेधक कोर्टरूम ड्रामाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कायदा यंत्रणेमधील न्‍यायाच्‍या अभावाला सादर करत या शोच्‍या पहिल्‍या पर्वाने लैंगिक छळ व मृत्‍यूदंड अशा ज्वलंत विषयांना प्रकाशझोतात आणले. वूट सिलेक्‍ट आता या कायदेसंबंधित थ्रिलर सिरीजचे दुसरे पर्व सादर करण्‍यास सज्‍ज आहे. या दुस-या सिझनमध्ये पियुष मिश्रा, नेहा शर्मा व अक्षय ओबेरॉय पुन्हा एकदा प्रमुख भूमिकांत आहेत.

Tanuj Virwani
तनुज विरवानी
author img

By

Published : Apr 20, 2021, 1:43 PM IST

ओटीटी प्लॅटफॉर्म वर क्राईम शोजची चलती आहे. त्यातच प्रेक्षकांना कोर्टरूम ड्रामा देखील बऱ्याच प्रमाणात आवडतात. वूट सिलेक्‍टची ओरिजिनल सिरीज 'इल्‍लीगल' या लक्षवेधक कोर्टरूम ड्रामाने गुरू-शिष्यादरम्‍यानच्‍या प्रखर चढाओढीच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कायदा यंत्रणेमधील न्‍यायाच्‍या अभावाला सादर करत या शोच्‍या पहिल्‍या पर्वाने लैंगिक छळ व मृत्‍यूदंड अशा ज्वलंत विषयांना प्रकाशझोतात आणले. वूट सिलेक्‍ट आता या कायदेसंबंधित थ्रिलर सिरीजचे दुसरे पर्व सादर करण्‍यास सज्‍ज आहे. या दुस-या सिझनमध्ये पियुष मिश्रा, नेहा शर्मा व अक्षय ओबेरॉय पुन्हा एकदा प्रमुख भूमिकांत आहेत.

या पर्वात थोडा रोमान्सही दिसणार असून नेहा शर्माचा लव्ह इंटरेस्ट असणार आहे तनुज विरवानी. ‘इन्साईड एज’ या क्रिकेटवर आधारित वेब सिरीज मधील त्याच्या कामाचे भरपूर कौतुक झाले होते. हा तरूण व प्रतिभावान कलाकार, नेहा शर्माचा प्रेमी म्‍हणून ‘इल्‍लीगल' मध्ये प्रवेश करणार आहे. शोमधील त्‍यांची केमिस्‍ट्री निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल आणि मोहक दिसणारी ही जोडी पहिल्‍यांदाच स्क्रिनवर एकत्र काम करताना दिसणार आहे.

‘इल्‍लीगल' च्या टीममध्ये सामील होण्‍याबाबत तनुज विरवानी म्‍हणाला, ''मी 'इल्‍लीगल'चे पहिले पर्व पाहिले आहे आणि कथानक, कलाकारांचा अभिनय व सादरीकरणाने माझे लक्ष वेधून घेतले. म्‍हणूनच मला या मालिकेत सामील होण्‍यासोबत, श्री. पियुष मिश्रा यांच्‍यासारखे दिग्‍गज अभिनेते आणि नेहा, अक्षय व सत्‍यदीप यांच्‍यासारख्‍या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्‍याबाबत, विचारण्‍यात आले तेव्हा मला अधिक विचार करावा लागला नाही. कोर्टरूम ड्रामा ही शैली माझ्यासाठी नवीन आहे आणि ही शैली अत्‍यंत रोमांचक आहे. मी वकिलांच्‍या समूहामध्‍ये उद्योगपती म्‍हणून प्रवेश करत आहे आणि पडद्यावर यांच्‍यामधील डायनॅमिक कशाप्रकारे दिसून येते हे पाहण्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे.''

'इल्‍लीगल सीझन २' लवकरच वूट सिलेक्‍टवर स्ट्रीम होणार आहे.

हेही वाचा - हुमा कुरेशी म्हणते, ''जॅक स्नायडरसोबत गप्पा हा वेगळ्या जगात वावरल्याचा अनुभव''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.