मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. ती हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. यात तिने वयाच्या २४ व्या वर्षी घेतलेल्या एका निर्णयाने आयुष्य कसे बदलले याबद्दल बातचीत केली आहे. तिने २४ व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यावेळी सुष्मिता म्हणाली की दत्तक घेण्याची अनेक परिभाषा तिने ऐकल्या आहेत. ती स्वतः या स्थितीतून गेली आहे. २४ व्या वर्षी तिने एक मुलगी दत्तक घेऊन आई बनण्याचा निर्णय घेतला. सुष्मिताच्या या मोठ्या निर्णयाने तिला आयुष्यात स्थिर बनवले. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता कारण त्याकाळात ती अभिनय कारकीर्दीच्या शिखरावर होती. परंतु तिला याचा अभिमान वाटतो. ती म्हणाली, आई-वडिलांसाठी मुले असणे हा एक मोठा आशिर्वाद आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मोठ्या मुलीचे नाव रिनी सेन असून लहान मुलीचे नाव अलीशा सेन आहे. सुश्मिता आपल्या दोन्ही मुलींचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सुष्मिता सेन सुपर मॉडल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. त्याचे फोटोही ती नेहमी शेअर करीत असते.