ETV Bharat / sitara

फोटो शेअर करून सोनमने दिल्या सुनिता आणि अनिल कपूरना लग्नाच्या ३६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Anil Kapoor marriage anniversary

अनिल कपूर आणि सुनिता यांच्या विवाहाला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी त्यांच्या मुलीने म्हणजेच सोनम कपूरने फोटो शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

Sunita and Anil Kapoor
सुनिता आणि अनिल कपूर
author img

By

Published : May 19, 2020, 7:21 PM IST

मुंबई - अभिनेता अनिल कपूर आणि सुनिता यांच्या लग्नाला मंगळवारी ३६ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने त्यांची मुलगी सोनम कपूरने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर आई वडिलांचा एक फोटो शेअर करीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

तिने लिहिलंय, ''हॅप्पी अ‌ॅनिव्हर्सरी पेरेंट्स...मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमची आठवणही काढते. ३६ वर्ष विवाहाचे आणि ११ वर्ष डेटिंगचे..!!! तुमची प्रेमकहाणी सर्वात सुंदर, प्रेमळ हास्याने आमचे कुटुंब हासरे होत असते. कारण नाराजी फक्त सिनेमात असते, खऱ्या जीवनात नाही. तुम्ही तीन विश्वासू आणि खट्याळ मुलेही जन्माला घातलीत. आम्हाला खात्री आहे, की तुम्हाला आमच्याबद्दल अभिमान वाटेल.''

सुनितानेदेखील अनिल कपूर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनिताने लिहिलेल्या पोस्टमध्ये ''माझा पती हिच माझी आनंदाची जागा आहे. ३६व्या वर्धापनाच्या शुभेच्छा... मी तुमच्यावर काळाच्या पुढे जाऊन प्रेम करते.'' अनिल कपूरनेही पत्नीला फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसापूर्वी अनिलनेही एक फोटो शेअर केला होता. इन्स्टाग्रामवरील या फोटोत ते लॉकडाऊनच्या काळात आपले कॅरम कौशल्य दाखवताना दिसले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.