ETV Bharat / sitara

सिद्धार्थ - परिणीतीच्या 'जबरिया जोडी'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात - खडके ग्लासी

'जबरिया जोडी' चित्रपट हा बिहारच्या काही भागातील बळजबरी विवाह पद्धतीवर आधारित आहे. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना तिकिट बारीवर खेचण्यात तितकासा यशस्वी ठरला नाही.

सिद्धार्थ - परिनीतीच्या 'जबरिया जोडी'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात
author img

By

Published : Aug 10, 2019, 12:45 PM IST

Updated : Aug 10, 2019, 2:04 PM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांचा 'जबरिया जोडी' हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाची संथ सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
पहिल्याच दिवशी 'जबरिया जोडी'ने ३.१५ कोटीची कमाई केली आहे.

'जबरिया जोडी' चित्रपट हा बिहारच्या काही भागातील बळजबरी विवाह पद्धतीवर आधारित आहे. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना तिकिट बारीवर खेचण्यात तितकासा यशस्वी ठरला नाही. सिद्धार्थ - परिणीती शिवाय जावेद जाफरी, संजय मिश्रा, अपारशक्ती खुराना आणि शिबा चढ्ढा या कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. कमाईची सुरुवात जरी संथ असली, तरीही प्रेक्षकांनी मात्र, चित्रपटाची प्रशंसा केली आहे. प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि परिनीतीची केमेस्ट्री आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

जबरिया जोडीवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

चित्रपटात एकुण ७ गाण्यांचा समावेश आहे. यातील तनिष्क बागचीने रिमिक्स केलेले 'जीला हिलेला', 'खडके ग्लासी', हे गाणे हिट ठरले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि परिणीती दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्र झळकले आहेत. यापूर्वी दोघेही 'हसी तो फसी' या चित्रपटात झळकले होते. पहिल्या दिवशीचे आकडे पाहता 'जबरिया जोडी'ला आणखी कमाई करण्याची आवश्यकता आहे. आता आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत किती भर पडते, हे पाहणे रंजक ठरेल.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.