ETV Bharat / sitara

श्रद्धा- प्रभासचा अॅक्शन अवतार, 'साहो'चं नवं पोस्टर प्रदर्शित - neil nitin mukesh

हे पोस्टर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबतच चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारं आहे. आतापर्यंत चित्रपटातील अॅक्शन सीनचेच व्हिडिओ आणि फोटो प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.

श्रद्धा- प्रभासचा अॅक्शन अवतार, 'साहो'चं नवं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:12 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या 'साहो' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवरही 'साहो' आणि 'मिशन मंगल' यांची टक्कर टळली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही दिलासा मिळाला आहे. आता 'साहो'चं आणखी एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये श्रद्धा आणि प्रभासचा अॅक्शन अवतार पाहायला मिळतो.

हे पोस्टर प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबतच चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारं आहे. आतापर्यंत चित्रपटातील अॅक्शन सीनचेच व्हिडिओ आणि फोटो प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी चित्रपटातील रोमॅन्टिक पोस्टरही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यामुळे सिनेमातील लव्हस्टोरीचा अँगलही समोर आला होता.

यापूर्वी 'साहो' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र, याच दिवशी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर 'सेक्रेड गेम्स २' ही वेबसीरिजही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच, हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू या भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

सुजित यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात श्रद्धा आणि प्रभासशिवाय निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे आणि महेश मांजरेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.