ETV Bharat / sitara

'रंग माझा वेगळा' मालिकेतील हर्षदा खानविलकरचा लूक 'या' अभिनेत्रीने केला डिझाईन - कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्ये न्यूज

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकरच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सौंदर्या इनामदारचा हा लूक कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्ये हिने डिझाईन केला आहे.

हर्षदा खानविलकर आणि शाल्मली टोळ्ये
author img

By

Published : Nov 13, 2019, 11:30 AM IST

मुंबई - ‘स्टार प्रवाह’वर सुरू झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकरच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सौंदर्या इनामदारचा हा लूक कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्ये हिने डिझाईन केला आहे. शाल्मली स्वत: एक अभिनेत्री आणि नृत्यांगनाही आहे.

हर्षदा खानविलकर आणि शाल्मली टोळ्ये
हर्षदा खानविलकर आणि शाल्मली टोळ्ये

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या या व्यक्तीरेखेसाठी हर्षदा यांचा लूक डिझाईन करणे शाल्मलीसाठी मोठे आव्हान होते. याआधी हर्षदा यांच्या 'पुढचं पाऊल' या मालिकेतील अक्कासाहेब या व्यक्तिरेखेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. अक्कासाहेबांच्या साड्या आणि दागिने यांचे महिलावर्गात विशेष आकर्षण होते आणि आजही आहे. त्यामुळे नवीन मालिकेसाठी हर्षदाचा लूक डिझाईन करताना या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या.

हेही वाचा - 'मधुबाला'वर बनणार बायोपिक? इम्तियाज अलीने दिलं स्पष्टीकरण

सौंदर्या इनामदार ही अतिशय हुशार आणि करारी अशी बिझनेस वुमन आहे. नावातच सौंदर्य आहे, त्यामुळे सौंदर्यावर प्रेम करणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेला शोभेल असा पेहराव तयार करण्यात आला. पेस्टल शेड्सच्या साड्या आणि कमीत-कमी मात्र, हमखास छाप पाडणारे दागिने सौंदर्याच्या व्यक्तिरेखेसाठी वापरण्यात आले आहेत. हर्षदा ताईंच्या या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया शाल्मलीने व्यक्त केली.

हेही वाचा - लतादीदींची प्रकृती स्थिर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर घेताहेत दीदींची काळजी

कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना ती कशी दिसते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. लूक डिझाईन करताना त्यात मी माझी मते मांडत असते. यावेळी मात्र सौंदर्याच्या लूकचे संपूर्ण श्रेय कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येला आहे. अक्कासाहेबांच्या पेहरावाची छाप सौंदर्याच्या लूकमध्ये कुठेही दिसत नाही, हेच या व्यक्तिरेखेचे यश आहे. आत्तापर्यंत अक्कासाहेबांच्या भूमिकेमधून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. आता ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असे हर्षदा खानविलकर म्हणाल्या.

Intro:‘स्टार प्रवाह’वर सुरु झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सौंदर्या इनामदारचा लूक डिझाईन केलाय कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येने. शाल्मली स्वत: एक अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगनाही आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतला हर्षदा यांचा लूक डिझाईन करणं शाल्मलीसाठी एक मोठं आव्हान होतं. याआधी हर्षदा यांच्या पुढचं पाऊल या मालिकेतल्या अक्कासाहेब या व्यक्तिरेखेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. अक्कासाहेबांच्या साड्या आणि दागिने यांचं महिलावर्गात विशेष आकर्षण होतं आणि आजही आहे. त्यामुळे सौंदर्याचा लूक डिझाईन करताना या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या. सौंदर्या इनामदार ही अतिशय हुशार आणि करारी अशी बिझनेस वुमन आहे. नावातच सौंदर्य आहे. त्यामुळे सौंदर्यावर प्रेम करणारी अशी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेला शोभेल असा पेहराव डिझाईन करण्यात आलाय. मॉडर्न पण परंपरेला धरुन असा मिलाफ साधण्याचा प्रयत्न सौंदर्याच्या लूकसाठी करण्यात आलाय. पेस्टल शेड्सच्या साड्या आणि कमीत कमी पण हमखास छाप पाडणारे दागिने सौंदर्याच्या व्यक्तिरेखेसाठी वापरण्यात आले आहेत आणि हीच या व्यक्तिरेखेची खासियत आहे. हर्षदा ताईंच्या या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया शाल्मलीने व्यक्त केली.

सौंदर्या इनामदारच्या व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी सांगतना हर्षदा ताई म्हणाल्या, ‘कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना ती कशी दिसते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. लूक डिझाईन करताना त्यात मी माझी मतं मांडत असते. पण यावेळी मात्र सौंदर्याच्या लूकचं संपूर्ण श्रेय जातं कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येला. तिने उत्तमरित्या माझा लूक डिझाईन केलाय. अक्कासाहेबांच्या पेहरावाची छाप सौंदर्याच्या लूकमध्ये कुठेही दिसत नाही. मला वाटतं हेच या व्यक्तिरेखेचं यश आहे. आता पर्यंत अक्कासाहेबांच्या भूमिकेमधून प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलंय. आता ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.