ETV Bharat / sitara

क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतला वाटते 'हा' बनावा मराठी बिग बॉस - Rakhi Sawant s

बिग बॉस स्पर्धेत माधव देवचके विजयी व्हावा यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सांवत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सलील अंकोला आणि राखी सावंत
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:31 AM IST

मुंबई - 'बिग बॉस' हा रिएलिटी शो भारतात 2006 ला सुरू झाला. बिग बॉस हिंदीच्या 2006 च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत आणि क्रिकेटर सलील अंकोला कंटेस्टंट होते. राखी तर टॉप-5 पर्यंत या शोमध्ये राहिली होती. आता बिग बॉसमध्ये तशाच पध्दतीने माधव देवचकेही टिकून राहावा म्हणून राखीने शुभेच्छा दिल्या आहेत.

राखी सावंत म्हणते, “माधव खूप चांगला माणूस आहे. तो खूप चांगला कलाकार आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या आणि माधव तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर यायचं नाहीये. तू जिंकूनच ये. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. ”

सलील अंकोला आणि राखी सावंत

माधव चांगला अभिनेता असण्याशिवाय तो उत्तम क्रिकेटर आहे. त्यामुळेच क्रिकेटर सलील अंकोला यांच्यासोबत माधवची मैत्री आहे. आपला मित्र माधवला सगळ्यांनी व्होट करावे म्हणून सलील अंकोला यांनीही प्रेक्षकांना आवाहन केले आहे. सलील अंकोला म्हणाले, “माझा प्रिय मित्र माधव खूप चांगला माणूस आहे. तो खूप चांगला खेळतोय. तो एक स्ट्राँग्र कंटेस्टंट आहे. तो खूप एन्टरटेनिंगही आहे. त्याला भरभरून मत द्या. ज्यामुळे तो बिग बॉसमध्ये टिकून राहील आणि आपले असेच मनोरंजन करत राहील.”

Intro:Body:

raj sir 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.