मुंबई - 'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिकू राजगुरू लवकरच वेबविश्वात पदार्पण करणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर आता हिंदीमध्ये ती आपल्या अभिनयाची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. डिजीटल वेब सीरिज 'हंड्रेड' मधून ती हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री घेत आहे.
'हंड्रेड' या वेबसीरिजमध्ये ती 'नेत्रा पाटील'च्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये अॅक्शनसोबतच ती कॉमेडी देखील करताना दिसणार आहे. याबाबत रिंकूने सांगितले, की 'हंड्रेड' हा माझा पहिलाच डिजीटल शो आहे. या निमित्ताने मला हिंदीमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन करता येणार आहे. ही वेबसीरिजमध्ये रिंकूसोबत लारा दत्ता आणि करण वाही यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होईल.