ETV Bharat / sitara

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील जयदीप-गौरी च्या पुनःलग्नात ‘रेट्रो’ प्री-वेडिंग फोटोशूट! - सुख म्हणजे नक्की काय असतं सीरीयल

स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या रेसमध्ये सर्वांच्या पुढे रहात असते आणि त्यावरील अनेक मालिका टीआरपी चार्टमध्ये आघाडीवर असतात. यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरत आहे. या मालिकेत शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य, ते थाटातच पार पडतं. आता लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे.

sukh mhnje kay asta serial
sukh mhnje kay asta serial
author img

By

Published : Nov 28, 2021, 5:21 AM IST

मुंबई - स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या रेसमध्ये सर्वांच्या पुढे रहात असते आणि त्यावरील अनेक मालिका टीआरपी चार्टमध्ये आघाडीवर असतात. यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरत आहे. या मालिकेत शिर्केपाटील कुटुंबात एखादा सणसमारंभ असो वा कोणतंही शुभकार्य, ते थाटातच पार पडतं. आता लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा थाट पाहायला मिळणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख म्हणजे नक्की काय असतं

माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्न देखिल अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल. लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमके कसा असणार याची उत्सुकता आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख म्हणजे नक्की काय असतं

खरंतर खूप काळानंतर आणि खूप संघर्षानंतर शिर्केपाटील कुटुंब आनंदात आहे. त्यांच्या या आनंदात प्रेक्षकांनी देखील सहभागी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे. जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत. तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक धारण केला आहे. तर अम्मा दिसणार आहे. ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्ताने हटके अंदाजात दिसणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख म्हणजे नक्की काय असतं

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर.

हेही वाचा - अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार, व्हिडिओ शेअर केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.